शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सोनपेठ शहरातील मुख्य रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:02 IST

शहरातील मुख्य असलेला पाथरी-परळी व शेळगाव हा रस्ता आगोदरच अरुंद आहे. त्यातही भर चौकात अतिक्रमण करत प्रतिष्ठाने थाटल्याने या ...

शहरातील मुख्य असलेला पाथरी-परळी व शेळगाव हा रस्ता आगोदरच अरुंद आहे. त्यातही भर चौकात अतिक्रमण करत प्रतिष्ठाने थाटल्याने या ठिकाणी वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पाथरी-परळी हा रस्ता नुकताच राष्ट्रीय महामार्ग घोषित केला असला तरी या रस्त्याच्या कामाची सुरुवात झाली नाही. तो कधी होईल हा फार मोठा प्रश्न असला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास होत असून रहदारीला मुख्य अडथळा हे अतिक्रमण ठरत आहे. याकडे सबंधित प्रशासनाने लक्ष ठेवून कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

शिवाजी महाराज चौकात नेहमीच वाहतूक कोंडी

पाथरी-परळी व गंगाखेड रस्त्यावरील रहदारीसाठीचा मुख्य असलेल्या शिवाजी महाराज चौकात सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करत व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने थाटले आहेत. शिवाय याच चौकात तालुक्यातील मोठी बँक असल्याने येथे कायमच गर्दी असते. आगोदरच अरुंद रस्ता आणि नागरिकांची गर्दी यामुळे या ठिकाणी वाहतुकीची नेहमीच कोंडी होत असते. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

ऊस वाहतुकीला अतिक्रमणांचा फटका

परिसरातील उसाचे क्षेत्र व तालुक्यातील कारखाना असल्याने सोनपेठ शहरातून उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. या ऊस वाहतुकीलासुद्धा शहरातील अतिक्रमणामुळे कारखान्याकडे जायला उशीर होत असून परिणामी उशिरा माप होत आहेत. यामुळे उसाच्या वाहतुकीलासुध्दा शहरातील अतिक्रमणाचा फटका बसत आहे.