शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेत विधानसभेचे गाजर; मविआसह महायुतीची इच्छुक नेतेमंडळी लागली कामाला

By ज्ञानेश्वर भाले | Updated: April 23, 2024 14:15 IST

या निवडणुकीच्या आखाड्यातून आगामी काळात होणाऱ्या विधानसभेची रणनीती बहुतांश मतदारसंघात आखली जात आहे.

परभणी : अवघ्या दोन दिवसांवर लोकसभेच्या प्रचारास पूर्णविराम लागणार असल्याने महाविकास आघाडी, महायुती यांच्यासह इतर पक्ष, अपक्ष उमेदवार आणि त्यांचे पदाधिकारी आपल्या उमेदवारांच्या मताधिक्यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र या लोकसभेच्या रणसंग्रामात नकळत विधानसभा निवडणुकीची बीजे रोवली जात आहे. लोकसभेचा हा रणसंग्राम असला तरीही, यातून विधानसभेच्या राजकीय गणितांची घडी बसविण्यात येत आहे. त्यामुळे आजी-माजी आमदारांसह इच्छुक नेते मंडळी त्यादृष्टीने कामाला लागल्याची परिस्थिती दिसून येत आहेत.

लोकसभा निवडणूक देशाचे हवा बदलणारी असते. यात मिळालेल्या बहुमताच्या बळावर अनेक राज्यांची राजकीय गणिते मांडली जातात. या रणसंग्रामानंतर साधारण सहा महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या लोकसभेच्या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, महाविकास आघाडी, महायुतीचे पदाधिकारी आपल्या उमेदवाराच्या पाठीशी उभा राहून पुढील गणिते मांडत आहे. यासह वंचित बहुजन आघाडीसह इतर पक्ष आणि अपक्षसुद्धा आपापल्या पातळीवर विजयाची आकडेमोड करताय. परभणी लोकसभा मतदारसंघासाठी २६ एप्रिलला मतदान होत असून, प्रशासकीय स्तरावर जवळपास तयारी झाली आहे. राजकीय स्तरावर प्रचार तोफा दोन दिवसांनंतर थंड होणार असून, यानंतर खरी रणनीती सुरू होईल.

शक्तिप्रदर्शनातून मांडली जाणार गणितेलोकसभेच्या रणसंग्रामात गत ३५ वर्षांत येथील मतदारांनी सेनेच्या उमेदवाराला पसंती दिल्याने राज्यभरात परभणीचा डंका वाजतो. मात्र या निवडणुकीत राजकीय परिस्थिती वेगळी असून महाविकास आघाडीविरुद्ध महायुतीत जोरदार लढत आहे. या निवडणुकीच्या आखाड्यातून आगामी काळात होणाऱ्या विधानसभेची रणनीती बहुतांश मतदारसंघात आखली जात आहे. त्यामुळे लोकसभेच्या निकालावर विधानसभेतील मतदारांचा कौल नेत्यांपुढे येईल. त्यामुळे सहा विधानसभा क्षेत्रनिहाय आजी माजी आमदारांसह इच्छुक नेते, पदाधिकारी आपल्याच पक्षाचा उमेदवार निवडून यावा, त्याला आपल्या मतदारसंघातून आघाडी देण्याच्या दृष्टीने शक्तिप्रदर्शनासह रणनीती आखली जात आहे.

सहा विधानसभा १३०० गावेपरभणी लोकसभा निवडणुकीत मतदारसंघातील ६ विधानसभा क्षेत्रातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आजी - माजी आमदार, पदाधिकारी आपापल्या पातळीवर प्रयत्नशील आहे. यात निवडणुकीच्या माध्यमातून अनेक जण विधानसभेची गणिते मांडत त्याअनुषंगाने प्रचाराला लागला आहे. लोकसभा मतदारसंघातील १३०० गावांत महायुती, महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला जात आहे.

टॅग्स :parbhani-pcपरभणीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४