तीन दिवसांपासून रुग्ण संख्येत मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST2021-06-02T04:15:18+5:302021-06-02T04:15:18+5:30

परभणी : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली असून, मागील तीन दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या शंभर पेक्षाही कमी आहे. ...

A large drop in the number of patients over three days | तीन दिवसांपासून रुग्ण संख्येत मोठी घट

तीन दिवसांपासून रुग्ण संख्येत मोठी घट

परभणी : कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली असून, मागील तीन दिवसांपासून नव्या रुग्णांची संख्या शंभर पेक्षाही कमी आहे. मंगळवारी जिल्ह्यात ६४ रुग्ण नोंद झाले तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग लक्षणीयरित्या घटला आहे. मागील आठवड्यामध्ये शंभर ते दीडशे रुग्ण दररोज नोंद होत होते. आता ही संख्या १०० पेक्षाही कमी झाली आहे. मंगळवारी आरोग्य विभागाला १ हजार ६७६ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. आरटीपीसीआरच्या १ हजार ३२९ अहवालांमध्ये ५० आणि रॅपिड टेस्टच्या ३४७ अहवालांमध्ये १४ असे ६४ रुग्ण नोंद झाले आहेत.

कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाणही आता घटले आहे. जिल्ह्यात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात आयटीआय हॉस्पिटलमध्ये एक आणि जिल्हा परिषदेच्या कोविड रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये एक महिला आणि एका पुरूषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९ हजार ९८७ झाली असून त्यापैकी ४५ हजार ९६६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १ हजार २३३ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या २ हजार ७८८ रुग्ण उपचार घेत आहेत.

४०८ रुग्णांना सुट्टी

कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. १ जून रोजी ४०८ रुग्णांना कोरोनाची लक्षणे नसल्याने सुट्टी देण्यात आली आहे. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याने उपचाराधीन रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

Web Title: A large drop in the number of patients over three days