शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

५०० खाटांचे जंम्बाे काेविड सेंटर उभारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:18 IST

परभणी : जिल्ह्यातील रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता येत्या आठ दिवसात ५०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारले जाणार असून, ...

परभणी : जिल्ह्यातील रुग्ण वाढीचा वेग लक्षात घेता येत्या आठ दिवसात ५०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर उभारले जाणार असून, प्रत्येक तालुक्यात ५० खाटांचे कोविड सेंटर सुरू केले जाणार असल्याची माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली.

मलिक यांनी गुरुवारी शहरातील सर्व कोविड रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. मलिक म्हणाले, जिल्ह्यात सध्या कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासनाने ७०० खाटांची क्षमता सध्या उपलब्ध केली असून, आणखी ५०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर कल्याण मंडपम या ठिकाणी उभे केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ५० खाटांचे सेंटर प्रत्येक तालुक्यात उभारून ४०० बेड आणखी वाढविले जाणार आहेत. त्यामुळे येत्या आठ दिवसामध्ये किमान १ हजार बेडची क्षमता वाढलेली जाईल. रुग्णांना ऑक्‍सिजनची कमतरता जाणवू नये, यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. ५०० सिलिंडर भरतील असे दोन प्रकल्प जिल्ह्याला मंजूर झाले असून, त्यातून १ हजार जम्बो सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. तसेच तालुक्याच्या ठिकाणी मिनी ऑक्सिजन प्रकल्पही उभारला जाणार असून, त्याद्वारे प्रत्येक ठिकाणी ३० जम्बो सिलिंडर उपलब्ध केले जाणार आहे. तसेच ऑक्सिजन कॉनस्ट्रेटर मशीनही खरेदी केल्या जाणार असून दोन बेडवरील रुग्णांना ऑक्सिजन उपलब्ध केले जाईल. सध्या जिल्ह्याला कर्नाटकातील बेल्लारी येथील जिंदाल स्टील प्रकल्पातून दररोज २० के एल ऑक्सिजन उपलब्ध होत आहे. त्यामुळे ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. रेमडेसिविर इंजेक्शन संदर्भातही तयारी करण्यात आली आहे. गुरुवारी जिल्ह्याला मोठा साठा उपलब्ध होईल. कोविड रुग्णालयाच्या बाहेर मोठे स्क्रीन लावून रुग्णालयातील उपलब्ध बेड, ऑक्सिजन बेट या संदर्भातील माहिती द्यावी, असे आदेशही दिले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी खा. फौजिया खान, आ. डॉ. राहुल पाटील, आ. सुरेश वरपूडकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जि. प. सीईओ शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार आदींची उपस्थिती होती.

रुग्णांचा मनोरंजनाची ही सुविधा

कोरोना रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना मनोरंजनाचे साहित्यही उपलब्ध करून केले जाईल. त्यानुसार रुग्णालयांमध्ये प्रत्येक ठिकाणी टीव्ही तसेच ग्रंथालय उपलब्ध केले जाणार आहेत.

जिल्ह्यात मृत्यूचा दर का वाढला

नागरिक कोरोनाचा आजार अंगावर काढतात. गंभीर झाल्यानंतरच रुग्णालयात दाखल होतात. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा दर वाढला आहे. हा दर राज्याच्या दरापेक्षा ही अधिक असल्याचे मलिक यांनी यावेळी सांगितले.