उपलब्ध खाटांची माहिती आता मोबाईल ॲपवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:18 AM2021-05-07T04:18:30+5:302021-05-07T04:18:30+5:30

परभणी : जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती आता मोबाईल ॲपद्वारे मिळणार आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या ...

Information on available beds is now available on the mobile app | उपलब्ध खाटांची माहिती आता मोबाईल ॲपवर

उपलब्ध खाटांची माहिती आता मोबाईल ॲपवर

Next

परभणी : जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती आता मोबाईल ॲपद्वारे मिळणार आहे. जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या संकल्पनेतून ‘पीबीएनलाईव्हबेडस्‌’ हे ॲप विकसित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे रुग्णालयांमध्ये खाटा मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे. ही गैरसोय थांबविण्यासाठी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी ऑनलाईन ॲप तयार करण्याची संकल्पना मांडली. त्यातूनच ‘पीबीएनलाईव्हबेडस्‌’ हे मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे.

म. शं. शिवणकर प्रतिष्ठान या संस्थेने राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली हे ॲप्लिकेशन विकसित केले असून, परभणी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरून नागरिकांना हे ॲप विनामूल्य डाऊनलोड करता येणार आहे. त्याचप्रमाणे गुगल ॲप स्टोअरमध्येही पीबीएनलाईव्हबेड्स हे ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे. ॲप विकसित केल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती एका क्लिकवर नातेवाइकांना मिळणार आहे.

४४ आरोग्य केंद्रात रुग्णांवर उपचार

कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी जिल्ह्यात एकूण ४४ आरोग्य संस्था कार्यरत आहेत. त्यामध्ये १३ कोविड केअर सेंटर, ४ डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल आणि २७ डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरचा समावेश आहे. या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती मोबाईल ॲपवर मिळणार आहे.

कर्मचाऱ्यांना दिले प्रशिक्षण

जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी कोविड उपचार केंद्रांवर सद्य:स्थितीत उपलब्ध असलेल्या खाटांची माहिती उपचार केंद्रांवरून ॲपवर अपलोड करण्यासाठी सर्व केंद्रांना स्वतंत्र लॉगिन दिले आहे. तसेच ही माहिती भरण्याचे प्रशिक्षणही कर्मचाऱ्यांना देण्यात आले. नवीन रुग्ण भरती झाल्यानंतर आणि रुग्ण डिस्चार्ज झाल्यानंतर ॲपमध्ये माहिती तत्काळ भरण्याच्या सूचना या कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

Web Title: Information on available beds is now available on the mobile app

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.