परभणी, जिंतूर शहर, परिसरात जोरदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 00:09 IST2019-09-18T00:08:26+5:302019-09-18T00:09:33+5:30
परभणी, जिंतूर शहर व परिसरात मंगळवारी जोरदार पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते़

परभणी, जिंतूर शहर, परिसरात जोरदार पाऊस
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी, जिंतूर शहर व परिसरात मंगळवारी जोरदार पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते़
परभणी शहरात दुपारी ३ च्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या़ जवळपास १० मिनिटे पाऊस झाला़ त्यानंतर रात्री ८़३० च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली़ जवळपास पाऊण तास जोरदार पाऊस झाला़ या पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना दिसून आले़
दरम्यान, जिंतूर शहर व परिसरातही रात्री ८ च्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली़ या पावसामुळे शहरातील रस्त्यावरून पाणी वाहताना दिसून आले़ मानवत शहरात रात्री ९ च्या सुमारास रिमझिम पाऊस झाला़ जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस होत आहे; परंतु, पावसामध्ये सातत्य राहत नसल्याने पडणारे पाणी जमिनीमध्ये मुरत नाही़ त्यामुळे जिल्हावासियांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागली आहे़