मान्सूनपूर्व पावसाची जिल्हाभरात जोरदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:13 AM2021-06-05T04:13:55+5:302021-06-05T04:13:55+5:30

परभणी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी जिल्ह्यातील शेळगाव व पाथरी तालुक्यांतील कासापुरी महसूल मंडळात ...

Heavy pre-monsoon rains across the district | मान्सूनपूर्व पावसाची जिल्हाभरात जोरदार हजेरी

मान्सूनपूर्व पावसाची जिल्हाभरात जोरदार हजेरी

Next

परभणी जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. गुरुवारी जिल्ह्यातील शेळगाव व पाथरी तालुक्यांतील कासापुरी महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्यानंतर शुक्रवारी पाथरी व गंगाखेड तालुक्यांत पुन्हा शुक्रवारी सकाळी १० च्या सुमारास एक तास मुसळधार पाऊस झाला. परभणी शहरातही ८ वाजेपासूनच पावसाची रिपरिप सुरू होती. सकाळी १० नंतर पाऊस थांबला. दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते. पूर्णा तालुक्यातील गौर व परिसरात मात्र सकाळी ९.३० च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. जवळपास एक तास हा पाऊस बरसला.

पुढील सहा दिवसही पावसाची शक्यता

जिल्ह्यात पुढील सहाही दिवस पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेट या हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या संस्थेने वर्तविली आहे. त्यामुळे यावर्षी मृगाचा प्रारंभ पावसाने होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

Web Title: Heavy pre-monsoon rains across the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.