शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

उसने दिलेले ३०० रुपये मागितले; त्यांनी युवकावर कोयत्याने ३१ वार केले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 13:22 IST

नाशिकवरून आलेल्या ४ जणांनी केली हत्या; आरोपी पोलीस स्थानकात हजर

ठळक मुद्देभावकीतील एकास उसने दिलेले ६०० रुपये मागितल्यास ३०० परत दिले उरलेल्या ३०० रुपयावरून दोघांमध्ये वाद झाला मृताबद्द्लही अनेक तक्रारी असल्याची पोलिसांकडे माहिती

सेलू ( परभणी ) : हात उसने दिलेल्या पैशाच्या देवाण-  घेवाणीवरून  चार जणांनी मिळून भावकीतीलच एका युवकांचा  कोयता आणि चाकूचे वार करून खून केल्याची घटना तालुक्यातील कुंडी येथे बुधवारी रात्री साडेआठ वाजेच्या  सुमारास घडली. चार पैकी तीन आरोपी शस्ञासह  कारने स्वत:हून रात्री साडे दहा वाजता  पोलिस ठाण्यात हजर झाले. मयताचे नाव राहूल देवीदास डंबाळे (३५) असे आहे. 

मयताची आई प्रयागबाई डंबाळे यांनी सेलू पोलिसात फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा राहूल देविदास डंबाळे  याने भावकीतीलच एकनाथ डंबाळे यांना ६०० रूपये उसने दिले होते. मंगळवारी रोजी सकाळी दहा वाजता दवाखान्यात जायचे काम पडल्याने राहूलने एकनाथ डंबाळे यांना पैसे मागितले.त्यांनी ३०० रूपये दिले.उर्वरित  तीनशे रूपयावरून राहूल आणि  एकनाथ डंबाळे यांच्यात शिवीगाळ होऊन भांडण झाले होते.दरम्यान, बुधवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास  एकनाथ डंबाळे यांचे नाशिक येथे राहणारे संतोष, कपील, प्रकाश हे तीन मुले व त्यांचा साथीदार मिलिंद देवीदास कांबळे रा मानोली ता मानवत हे चौघे जण कारने गावात दाखल झाले. राहूल घरासमोर उभा असतांना चौघांनी कोयता आणि चाकूने मानावर, हातावर  सपासप वार केल्याने राहूल रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यांचा जागीच मुत्यू झाला. चोघांनी तब्बल ३१ वार केले राहूल याच्या अंगावर तब्बल ३१ वार आहेत. खून करून आरोपी संतोष, कपील, मिलिंद कांबळे हे कार घेऊन क्रमांक ( एम एच १५ एफ टी- ४२४०) सेलू पोलीस ठाण्यात बुधवारी रात्री साडे दहा वाजता शस्ञासह हजर झाले. त्यांनी गुन्हाची कबुली दिली. तर प्रकाश एकनाथ डंबाळे यास कुंडी येथून पोलीसांनी अटक केली.घटनास्थळी पोलिस उपविभागीय अधिकारी प्रकाश एकबोटे, पोलिस निरिक्षक वसूंधरा बोरगावकर यांनी भेट देवून घटनेचा पंचनामा केला.राहूलकडून नेहमीच होता ञासपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत राहूल हा भावकीतील लोकांना नेहमीच ञास देत होता. तसेच त्यांची वर्तणूक चांगली नव्हती. महिलांवर वाईट नजर असल्याच्या त्याच्याविरुद्ध अनेक तक्रारी होत्या. यातूनच त्यांचा खुन झाला असावा असे  प्राथमिक तपासात समोर आले असल्याचे पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांनी सांगितले. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसparabhaniपरभणी