परभणीच्या बाबर कॉलनीत पकडला दोन लाखांचा गुटखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:13 IST2021-06-03T04:13:52+5:302021-06-03T04:13:52+5:30

पोलीस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, सहायक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे ...

Gutkha worth Rs 2 lakh seized in Babar Colony, Parbhani | परभणीच्या बाबर कॉलनीत पकडला दोन लाखांचा गुटखा

परभणीच्या बाबर कॉलनीत पकडला दोन लाखांचा गुटखा

पोलीस अधीक्षक जयंत मीना, अप्पर पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, सहायक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले, कर्मचारी दीपक मुंडे, जाकीर सय्यद, बंकट लटपटे, भागवत हुंडेकर, अनिल इंगळे, कपिल घोडके आदींनी मिळालेल्या माहितीच्या आधारे १ जून रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास बाबर कॉलनी परिसरात छापा टाकला. यावेळी एमएच २२ डी १४१४ या क्रमांकाच्या स्काॅर्पिओ गाडीमधून पोलिसांनी जप्त केल्याच्या केलेल्या गुटख्याची मोजदाद केली. तेव्हा १ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा गुटखा आढळला. या कारवाईत गुटख्यासह ४ लाख रुपयांची गाडी असा ५ लाख ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी उमाकांत सुशे यांच्या फिर्यादीवरून आरोपी माणिक हरिभाऊ बाराखुदे, गजानन बालासाहेब बाराखुदे (दोघे रा. आंबेटाकळी, ता. जि. परभणी) आणि परळी येथील शेख नावाचा एक आरोपी अशा तिघांविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक तुरनर या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title: Gutkha worth Rs 2 lakh seized in Babar Colony, Parbhani