बँकांसह किराणा, आणि भाजीपाला दुकानेही आता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:16 AM2021-04-16T04:16:41+5:302021-04-16T04:16:41+5:30

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १ मेपर्यंत निर्बंध घातले आहेत. मात्र, या निर्बंधामधून बँक, भाजीपाला विक्रीची दुकाने व किराणा ...

Grocery and vegetable shops, including banks, are now closed | बँकांसह किराणा, आणि भाजीपाला दुकानेही आता बंद

बँकांसह किराणा, आणि भाजीपाला दुकानेही आता बंद

Next

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १ मेपर्यंत निर्बंध घातले आहेत. मात्र, या निर्बंधामधून बँक, भाजीपाला विक्रीची दुकाने व किराणा दुकाने, फळ विक्रेते,बेकरी मिठाई विक्रेते या दुकानांना सूट दिली होती. या संदर्भाने गुरुवारी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी नवीन आदेश काढला असून, किराणा दुकाने, भाजी बाजार, फळ विक्रेते, बेकरी मिठाई आणि खाद्य दुकाने १७ एप्रिलपासून ते २२ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत तसेच सर्व बँकांचे व्यवहार बंद राहतील. बँकांमध्ये केवळ अंतर्गत कामे, पेट्रोल पंप, गॅस एजन्सी यांचे बँक व्यवहार, कोरोना विषयक वैद्यकीय सेवा देणाऱ्या आस्थापना यांचे व्यवहार आणि शासकीय चालनाचे कामकाज वगळता इतर कामे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title: Grocery and vegetable shops, including banks, are now closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.