लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:07 IST2021-08-02T04:07:57+5:302021-08-02T04:07:57+5:30

रविवारी सकाळी ग्रामस्थांनी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी ग्रा.पं. सदस्य लिंबाजी ...

Greetings to Lokshahir Anna Bhau Sathe | लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन

रविवारी सकाळी ग्रामस्थांनी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी ग्रा.पं. सदस्य लिंबाजी कलाल, सतीश कलाल, धारुजी धाबे, आप्पासाहेब वराडे, बालासाहेब लिंगायत, संघपाल पारखे, अशोक तुरूकझाडे, अशोक पाजंगे आदींची उपस्थिती होती.

ग्रामपंचायत कार्यालय, रामपुरी

मानवत तालुक्यातील रामपुरी बु. येथील ग्रामपंचायत कार्यालयात रविवारी अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी उपसरपंच विशाल यादव, कृष्णा चव्हाण, गोविंद यादव व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

ताडकळस येथे अभिवादन

पूर्णा तालुक्यातील ताडकळस येथे रविवारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी गजानन अंबोरे, सहायक पोलीस निरीक्षक विजय रामोड, ग्रा.पं. सदस्य भगवान लाकडे, पांडुरंग अंबोरे, भाऊसाहेब अंबोरे, उत्तम अंबोरे, बबलू माने, प्रकाश फुलवरे, सुरेश मगरे, ज्ञानोबा घोडके आदींची उपस्थिती होती. यासह जिंतूर तालुक्यातील बामणी, पाथरी तालुक्यातील झरी, सेलू, शहर व पालम शहरात अण्णाभाऊंना अभिवादन केले.

Web Title: Greetings to Lokshahir Anna Bhau Sathe