मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्या; जिंतूर येथे जमियते उलमाए हिंदचे तीन तास धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 18:39 IST2018-08-10T18:39:45+5:302018-08-10T18:39:52+5:30
मुस्लीम समाजाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पाच टक्के आरक्षण द्या या मागणीकरिता जमियते उलमाए हिंदतर्फे तहसील कार्यालयासमोर तीन तास धरणे आंदोलन करण्यात आले.

मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण द्या; जिंतूर येथे जमियते उलमाए हिंदचे तीन तास धरणे आंदोलन
जिंतूर (परभणी ) : मुस्लीम समाजाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पाच टक्के आरक्षण द्या या मागणीकरिता जमियते उलमाए हिंदतर्फे तहसील कार्यालयासमोर तीन तास धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनात जमियते उलमाए हिंदचे तालुकाध्यक्ष मौ तजम्मूल अहेमद खान, सिराज नदवी, नगरसेवक टीका खान, उस्मान खान अब्दुल मुखीद, अब्दुल रहेमान, एम एजाज, शेख खिजर, सय्यद मुसा, सादेक कुरेशी, अहेमद बागवान आदींचा सहभाग होता. आंदोलकांनी मागणीचे निवेदन तहसीलदार यांना सादर करून आंदोलन मागे घेतले.