अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:08 IST2021-01-24T04:08:27+5:302021-01-24T04:08:27+5:30

या कार्यक्रमास पोलीस उपअधीक्षक राजेंद्र पाल, पो.नि. रमेश स्वामी, महामार्ग पथक प्रमुख प्रकाश कुकडे, वकील संघाचे ॲड.सुनील जाधव, ॲड.अनिरुद्ध ...

Follow traffic rules to avoid accidents | अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करा

अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करा

या कार्यक्रमास पोलीस उपअधीक्षक राजेंद्र पाल, पो.नि. रमेश स्वामी, महामार्ग पथक प्रमुख प्रकाश कुकडे, वकील संघाचे ॲड.सुनील जाधव, ॲड.अनिरुद्ध पांडे, पोउनि नागनाथ तुकडे, पोउनि लोकलवार, ॲड.अनिरुद्ध काळे, ॲड.यशपाल पंडित, ॲड.अरुण गोलाईत यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना न्या. गोरे यांनी वाहन चालक वाहतूक शाखेने घालून दिलेल्या अटीचे पालन करताना दिसून येत नाहीत. परिणामी, अपघातांची संख्या वाढली आहे. या अपघातात जीवितहानी ही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. यामुळे रस्त्यावरून वाहन चालवताना सर्वांनीच वाहतूक शाखेने घालून दिलेल्या नियमांचे, तसेच रस्त्यावर ठिकठिकाणी असणाऱ्या दिशादर्शकांचा योग्य वापर करावा, असे ते म्हणाले. यावेळी महामार्ग शाखेचे पथक प्रमुख प्रकाश कुकडे, यांनी वाहतूक नियमांची माहिती सांगितली. सूत्रसंचालन ॲड.मुकुंद पाटील यांनी केले.

Web Title: Follow traffic rules to avoid accidents