खुनाच्या तपासासाठी पोलीस ठाण्यासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:08 IST2021-01-24T04:08:47+5:302021-01-24T04:08:47+5:30

शहरातील तकिया मोहल्ला भागात राहणारा अख्तर जलील शाह (३०) हा छोटा हत्ती चालक होता. तो या ...

Fasting in front of the police station to investigate the murder | खुनाच्या तपासासाठी पोलीस ठाण्यासमोर उपोषण

खुनाच्या तपासासाठी पोलीस ठाण्यासमोर उपोषण

शहरातील तकिया मोहल्ला भागात राहणारा अख्तर जलील शाह (३०) हा छोटा हत्ती चालक होता. तो या व्यवसायासह शहरातील एका सिमेंट दुकानावर हमालीचेेेे काम करायचा. त्याचा गतवर्षी ६ फेब्रुवारी २०१९ रोजी ताडबोरगाव शिवारात खून झाला होता. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, एक वर्षाचा कालावधी उलटून गेला तरीही खुनातील आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे मयत अख्तर शहाच्या कुटुंबीयांनी खुनाचा तपास तातडीने लावावा, अशी मागणी १३ जानेवारी रोजी पोलीस अधीक्षक जयंत मीना यांच्याकडे होती. मागणी पूर्ण न झाल्याने अख्तर शहाचे बंधू रऊफ शहा, जलील शहा, लतीफाबी शहा, रिजवानाबी शहा यांनी पोलीस ठाण्यासमोर २३ जानेवारी रोजी उपोषण सुरू केले आहे.

Web Title: Fasting in front of the police station to investigate the murder