शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
6
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
7
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
8
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
9
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
10
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
11
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
12
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
14
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
15
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
16
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
17
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
18
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
19
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
20
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

प्रसिद्ध ‘वसमत टेरिकॉट’ आता उरले दस्तीपुरते; ‘पॉवरलूम’ला हवाय राजाश्रय !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 7:24 PM

हातमागासाठी प्रसिद्ध असलेल्या वसमतमध्ये विणकर समाज मोठ्या संख्येने आहे.

ठळक मुद्देपाच हजार कुटुंबांना रोजगार देणारा ‘पॉवरलूम’ पॉवरलूम व्यवसायात मजूर मिळत नाहीत

- चंद्रकांत देवणे

वसमत (जि. हिंगोली) : वसमतमधील पॉवरलूम  उद्योग तिथल्या अर्थव्यवस्थेचा कणाच आहे. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय ही इंडस्ट्री चालू असून, तब्बल ५ हजार कुटुंबांचा उदरनिर्वाह यावर चालू आहे. पण, कधी काळी प्रसिद्ध असलेला पॉवरलूम उद्योग आता दस्तीपुरता शिल्लक राहिला आहे. अशा परिस्थितीत त्याला गरज आहे ती राजाश्रय मिळण्याची!

हातमागासाठी प्रसिद्ध असलेल्या वसमतमध्ये विणकर समाज मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे घरोघरी हा व्यवसाय चालायचा. त्यावरच कुटुंब चरितार्थ चालायचा. हातमागाचे ‘वसमत टेरिकॉट’ कापड प्रसिद्ध होते. ते दूरदूरपर्यंत जायचे. यांत्रिकीकरणाने हातमाग कालबाह्य झाले. त्याची जागा यंत्रमागाने घेतली. वसमत येथे टेक्सकॉमचा यंत्रमाग प्रकल्प कार्यरत झाला. विणकरांना सभासद करून मजुरीवर कपडा उत्पादन केले जायचे. त्याकाळी हाच वसमतच्या विणकरांच्या रोजीरोटीचे साधन होते. शेकडो मजूर येथे काम करायचे. नांदेडच्या टेक्सकॉमवरून कच्चा माल यायचा. त्यातून कापड तयार होऊन परत टेक्सकॉमला जायचे. मीटरप्रमाणे मजुरी मिळायची. वसमतच्या विणकरांसाठी यंत्रमाग प्रकल्प मोठा आधार होता. मात्र, काळाच्या ओघात हा प्रकल्प बंद झाला. तेथील सभासदांना मालकी मिळाली. तेथील यंत्रमागावर विणकर स्वत:चे भांडवल लावून कापड उत्पादन करत आहेत. 

आजघडीला शहरात हजारांवर खाजगी यंत्रमाग चालतात. काही ठराविक मालकांकडे यंत्रमाग आहेत ते स्वत: भांडवल लावून उत्पादन करतात. तर उर्वरित दुसऱ्यांकडून कच्चा माल घेऊन मजुरीवर कापड उत्पादन करून देतात. यावर यंत्रमाग चालवणारे मजूर, भीम भरणारे, कांडी भरणारे, जॉबर (मेकानिक), तयार कापड धुलाई करणारे, इस्त्री करणारे, दस्तीला गाठी मारणारे, कापड विक्री करणारे सेल्समन आदी हजारो हातांना काम मिळते. शासनाची कोणतीही मदत व सवलत नाही. बँका कर्ज देण्यास तयार नसतात, अशा अवस्थेत वसमतमध्ये हा व्यवसाय सुरू आहे. ५ हजारांवर कुटुंबाच्या चुली चालतात. असा व व्यवसाय दुर्लक्ष्ति आहे. आता हळूहळू अडचणीत आला आहे. बंद पडण्याचीही भीती आहे. 

धोतीवरून दस्तीवरवसमतमध्ये कधीकाळी वसमत टेरिकॉट उत्पादन व्हायचे. कापडाच्या स्पर्धेत टेरिकॉट वापरणारे संपले आणि वसमत टेरीकॉट इतिहास जमा झाले. पावरलूमवर धोती उत्पादन सुरू झाले. वसमतची धोती ही राज्यभरात प्रसिद्ध झाली होती. आता धोती वापरणारे घटले आणि धोती उत्पादनही बंद झाले. आता वसमतमध्ये दस्तीचे उत्पादन प्रसिद्ध झाले आहे. त्याला विदर्भात मागणी आहे. दस्तीसाठी लागणारा कच्चा माल मुंबई, इचलकरंजी, भिवंडीहून येतो. वसमत येथील रोकडेश्वर सूतगिरणीवर उत्पादित होणारे सूत वापरले जायचे. त्यामुळे कापड उत्पादकांना वाहतुकीचा खर्च वाढला आहे. व्यवसाय अडचणीत आहे. उत्पादन कमी होत आहे. नफा कमी झाला आहे.

नव्या पिढीची पाठ : व्यवसायात काम करणारे मजूर अशिक्षित व अल्पशिक्षित आहेत. परंपरेने व अनुभवाने ते हे काम शिकतात. कुशल मजूर तयार करण्यासाठी प्रशिक्षणही नाही. परिणामी, या कामात नवी पिढीचे तरूण येत नाही. एकीकडे बेरोजगारांच्या फौजा असताना दुसरीकडे मजूर नाहीत म्हणून पॉवरलूम व्यवसाय अडचणीत आला आहे. 

मदतीचे मार्ग बंदशासनाची मदत नाही. बँका कर्ज देत नसल्याने स्वत:च्या मालकीचे यंत्रमाग असून भांडवल नाही. त्यामुळे मजुरीवर व्यवसाय करावा लागत आहे. या व्यवसायातील अडचणींकउे लक्ष देण्याची गरज आहे. -गोपाल महाजन, विणकर सोसायटी सचिव

अडचणी वाढत चालल्यापॉवरलूम व्यवसायात मजूर मिळत नाही. मजुरी वाढवली, तर तोटा होतो. कमी केली, तर मजूर काम सोडून जातात. नव्या पिढीचे तरूण हे काम करण्यास तयार नाहीत.  इतरही अनेक अडचणी आहेत. यात कोणी मदत करीत नाही. कच्चा मालही मिळणे अवघड झाले. - नारायण गठडी, व्यावसायिक 

टॅग्स :cottonकापूसbusinessव्यवसायparabhaniपरभणीfundsनिधी