शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेल उघडले म्हणून जिभेचे लाड नको, आला पावसाळा, पोट सांभाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:14 IST

शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर हॉटेल्स तसेच रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रीच्या हातगाड्यांना निर्बंधात सूट दिलेल्या वेळेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी ...

शहरात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर हॉटेल्स तसेच रस्त्यावरील खाद्य पदार्थ विक्रीच्या हातगाड्यांना निर्बंधात सूट दिलेल्या वेळेपर्यंत व्यवसाय करण्यास परवानगी दिली आहे. यासह रात्री दहा वाजेपर्यंत हॉटेल्समधून पार्सल सुविधा सुरू आहे. मागील अनेक महिन्यांपासून बाहेरचे खाणे टाळलेल्या खवय्यांना पावसाळी वातावरणाने हाॅटेल्समधील खाद्यपदार्थ खावे वाटत आहेत. त्यामु‌ळे अनेकजण हाॅटेल्समधील खाद्यपदार्थांवर ताव मारत आहेत. पावसाळ्यात पचनशक्ती मंद होते. यामुळे बाहेरील तसेच जड अन्न खाल्ल्यास त्यातून अपचन, पित्त वाढण्याचा धोका असतो. यातून पोटाचे विकार जडू शकतात. यामुळे या काळात बाहेरील खाद्यपदार्थ खाताना काळजी घेतलेली बरी, असे डाॅक्टरांचे मत आहे.

रस्त्यावरचे अन्न नकोच

शहरात फास्टफूड, भेळ, पाणीपुरी, पोहे, मिसळ, उडपी पदार्थ यांसारखे खाद्यपदार्थ विक्री करणारे अनेक हातगाडे जागोजागी उभे राहतात. यातील अनेक ठिकाणांवर स्वच्छता नसते. तसेच काही ठिकाणी परिसरात नाली, अस्वच्छ पाणी, फिरती जनावरे यांचा वावर असतोे. तसेच प्लेटची स्वच्छता आणि बसण्यास असलेली जागा, पिण्याचे पाणी याकडे दुर्लक्ष केले जाते. यामुळे चमचमीत वाटणारे रस्त्यावरील अन्नपदार्थ खाताना प्रत्येकाने आपल्या तब्येतीची काळजी घेणे गरजेचे आहे. या ठिकाणी उघड्या खाद्यपदार्थांवर किटक बसण्याचा धोका असतो.

पावसाळ्यात हे खायला हवे

- शक्यतो ताजे अन्न व शिजवलेले गरम अन्न

- कमी तिखट, कमी तेलकट, कमी मसाला वापरलेले पदार्थ

- जास्तीत जास्त फळांचे सेवण करावे

- बाहेरील खाद्यपदार्थ शक्यतो नकोच

पावसाळ्यात हे खाणे टाळावे

- अंबवलेले पदार्थ

- हिरवी मिरची

- फास्टफूड

- आंबट, तिखट पदार्थ.

- काळा मसाला, लाल मसाला

- शिळे अन्न खाऊ नये

आहारतज्ज्ञ काय म्हणतात ?

पावसाळ्यात पित्तप्रकोपात वाढ होते. यामुळे पचनशक्ती मंद होते. जेव्हा भूक असेल तेव्हा आवश्यक तेवढेच जेवण करावे. उघडे अन्नपदार्थ खाऊ नयेत. शिळे अन्नपदार्थ खाणे टाळले पाहिजे. उघडे अन्न पदार्थ खाल्ल्याने त्रास होऊ शकतो. यामुळे हाॅटेलमधील तसेच बाहेरील खाद्यपदार्थ खाताना काळजी घ्यावी. - डाॅ. प्रशांत धमगुंडे, आहारतज्ज्ञ.