खासदार निधीतून जिल्हा रुग्णालयास मिळाली कार्डियाक रुग्णवाहिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:16 IST2021-04-06T04:16:51+5:302021-04-06T04:16:51+5:30

परभणी जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण होत आहे. जिल्हा रुग्णालयात दररोज शेकडो गंभीर आजाराचे रुग्ण ...

The district hospital received a cardiac ambulance from the MP's fund | खासदार निधीतून जिल्हा रुग्णालयास मिळाली कार्डियाक रुग्णवाहिका

खासदार निधीतून जिल्हा रुग्णालयास मिळाली कार्डियाक रुग्णवाहिका

परभणी जिल्ह्याची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण होत आहे. जिल्हा रुग्णालयात दररोज शेकडो गंभीर आजाराचे रुग्ण येतात; परंतु जिल्हा रुग्णालयात पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना नांदेड, औरंगाबाद, मुंबई किंवा पुणे येथे पाठविले जाते. अशा वेळी सर्व सोयी-सुविधांयुक्त रुग्णवाहिकादेखील उपलब्ध नसते. गंभीर आजाराच्या रुग्णांना साध्या रुग्णवाहिकेनेच इतर जिल्ह्यांतील रुग्णालयांत हलविले जाते. रुग्णवाहिकेत ऑक्सिजन किंवा इतर सुविधा नसल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा रुग्णालयासाठी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेली कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्सची सोय करावी, अशी मागणी नागरिकांतून होत होती. सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने गंभीर रुग्णांना इतर जिल्ह्यांत हलविणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर खा. बंडू जाधव यांनी २०१९-२० च्या खासदार निधीतून जिल्हा रुग्णालयास कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. ५ एप्रिल रोजी या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी खा. बंडू जाधव यांच्यासह जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.एस. नागरगोजे, डॉ. प्रकाश डाके, डॉ. बी.टी. धुतमल, डॉ. कल्याण कदम, डॉ. मस्के, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, दीपक बारहाते, गंगाप्रसाद आनेराव, युवा सेनाप्रमुख अर्जुन सामाले, उपमहापौर भगवान वाघमारे, व्यापारी गोविंद अजमेरा, अतुल सरोदे आदींची उपस्थिती होती.

Web Title: The district hospital received a cardiac ambulance from the MP's fund