मानवत येथे शेततळ्यात बुडून बाप-लेकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 18:38 IST2018-07-27T18:38:20+5:302018-07-27T18:38:48+5:30
शेततळ्यात पडलेल्या मुलास वाचविण्यास गेलेल्या पित्याचाही मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी तालुक्यातील केकर जवळा येथे घडली.

मानवत येथे शेततळ्यात बुडून बाप-लेकाचा मृत्यू
मानवत : शेततळ्यात पडलेल्या मुलास वाचविण्यास गेलेल्या पित्याचाही मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी २ वाजता तालुक्यातील केकर जवळा येथे घडली.
तालुक्यातील केकरजवळा येथील शेतकरी पांडुरंग रंगनाथ लाडाणे यांची गाव शिवारात शेती आहे. त्यांनी तेथे शेततळे बांधले आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने यात २० फुटापर्यंत पाणी साचले आहे. आज या तळ्यात कुत्र्याचे पिलु मरण पावले. त्याला बाहेर काढण्यासाठी लाडाणे यांचा २० वर्षाचा मुलगा अमोल शेततळ्याजवळ गेला. मात्र, तोल सांभाळता न आल्याने तो त्यात पडला. अमोल पाण्यात बुडाल्याचे लक्षात येताच लाडाणे यांनी त्याला वाचविण्यासाठी तळ्यातील उडी घेतली. मात्र तेही पाण्यात बुडू लागले. यात दोघा पिता-पुत्राचा अंत झाला.