शहरं
Join us  
Trending Stories
1
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
2
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
3
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
4
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
5
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
6
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
7
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
8
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
9
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
10
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
11
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
12
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
13
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
14
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
15
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
16
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
17
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
18
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
19
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
20
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

रविवारपर्यंत जिल्ह्यात अवकाळी पावसाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:18 IST

वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतमालाच्या नुकसानीसह जीवितहानीदेखील होत आहे. मागील आठवड्यात २५ एप्रिल रोजी जिल्ह्यात ...

वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह होणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतमालाच्या नुकसानीसह जीवितहानीदेखील होत आहे. मागील आठवड्यात २५ एप्रिल रोजी जिल्ह्यात वीज पडून दोन मेंढपाळांसह एक शेतकरी अशा तिघांचा मृत्यू झाला होता. तसेच चार बैल दगावले होते. आंबा पिकाचेही मोठे नुकसान झाले होते.

आता पुन्हा अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण मौसम सेवा विभागाच्या अंदाजानुसार ७ व ८ मे रोजी मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, या काळात ताशी ३० ते ४० किमी या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. ९ मे रोजी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांत अवकाळी पाऊस होण्याचा अंदाज आहे. १० मे रोजी उस्मानाबाद, लातूर, नांदेड व बीड जिल्ह्यातील पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तेव्हा या काळात नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, झाडाच्या आडोशाला उभे राहू नये तसेच पशुधनास निवाऱ्याच्या जागी बांधावे, असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्‍या ग्रामीण कृषी मौसम सेवेने केले आहे.