शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : परभणीत नाकाबंदी धुडकावणाऱ्या अधिकाऱ्याचा पोलिसांनी केला पाठलाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 15:25 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याकडून नियम धाब्यावर

ठळक मुद्देयेलदरी - सेनगाव रस्त्यावरील थरार

येलदरी (जि.परभणी) : जिल्ह्याच्या सिमेवरील नाकाबंदीला न जुमानता भरधाव वेगाने स्कॉर्पिओ कार घेवून जाणाºया राज्य उत्पादन शुल्काच्या दुय्यम निरीक्षकाचा पोलिसांनी २ किलो मीटर पाठलाग करून त्याला थांबविल्याचा थरार मंगळवारी दुपारी १२़३० च्या सुमारास येलदरी - सेनगाव रस्त्यावर घडला़ 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सर्व सिमांवर कडकडीत बंदोबस्त लावण्यात आला आहे़ जिल्हा  ग्रीनझोन मध्ये असल्याने महसुल व पोलीस यंत्रणा अतिशय दक्ष झाली आहे़ अशातच जिल्ह्याच्या सिमेवर सातत्याने परजिल्ह्यातील नागरिक प्रवेश करण्याचा खटाटोप करीत असल्याचे दिसून येत आहे़ त्यामुळे पोलीस यंत्रणेची डोकेदुखी वाढली आहे़ त्यात मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाºयांच्या बेजबाबदारीमुळे भर पडल्याचा प्रकार पहावयास मिळाला़ येलदरीहून सेनगावकडे जाणाºया जिल्हा सिमेवर जिंतूर पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला आहे़ १४ एप्रिल रोजी दुपारी १२़३० च्या सुमारास एमएच ३८-७३५६ क्रमांकाची स्कॉर्पिओ येथील तपासणी नाक्यावर न थांबता येलदरीहून हिंगोली जिल्ह्यातील सेनगावकडे भरघाव वेगाने बॅरिगेट मधून निघून गेली़ यावेळी येथे कर्तव्यावर असलेले जिंतूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक लोखंडे, फड यांनी तातडीने २ किलो मिटर या गाडीचा दुचाकीवर पाठलाग केला़ त्यानंतर ही गाडी थांबविली व याबाबत सदरील वाहनचालकास जाब विचारत असतांना या गाडीमधून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुय्यम निरिक्षक बालाजी हिप्परगेकर उतरले़ त्यानी आपण राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी असल्याचे सांगितले़ अवैद्य दारू संदर्भात एक हिंट मिळाल्याने आपण कारवाईसाठी जात असल्याचे हिप्परगेकर म्हणाले़ त्यावर लोखंडे यांनी नाक्यावर गाडी का थांबविली नाही, असे विचारले असता चालक मोबाईलवर बोलत होता असे त्यांनी सांगितले़ त्यावर लोखंडे यांनी अशी बेजाबदारी खात्याचे अधिकारी करीत असतील तर, कसे चालेल? असा सवाल उपस्थित केला़ दिवसरात्र पोलीस तपासणी नाक्यावर तैनात आहेत़ हिंगोली जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण सापडला आहे़ त्यामुळे सर्व यंत्रणा दक्ष झाली असतांना आपली ही पोलिसांना सहकार्य न करण्याची भूमिका चुकीची असल्याचे ते म्हणाले़ त्यानंतर ही गाडी पुढील मार्गाने निघून गेली़     जिल्ह्याच्या सिमेवरील बंदोबस्त आणखी कडक करा - प्रमोद चव्हाणपरभणी जिल्ह्याच्या सिमेवरील बदोबस्त आणखी कडक करणे आवश्यक आहे़ बरेच नागरिक हिंगोली जिल्ह्यातून परभणी जिल्ह्यात येत असल्याचे पहावयास मिळत आहे़ त्यामुळे प्रशासनाने या बाबींची दखल घेवून परजिल्ह्यातील  एकही नागरिक परभणी जिल्ह्यात येणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे असे येलदरीचे सरपंच प्रमोद चव्हाण यांनी सांगितले़

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी