शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : सेलूत क्वारंटाईनसाठी ११० बेड  सज्ज; दोन वसतिगृह घेतली ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 14:29 IST

आयसोलेशन विभागात तीन शिफ्टमध्ये काम सुरू

ठळक मुद्देउपजिल्हा रुग्णालयात 20 बेड सज्ज45 वैद्यकीय अधिकारी कर्मचारी सेवेत

सेलू:- कोरोना विषाणूचा प्रादुर्भावाने देशासह जगाची झोप उडाली आहे. संपूर्ण देश आज लाॅक डाऊन आहे. महाराष्ट्र राज्य दुस-या टप्प्यात असल्याने आरोग्य विभाग राञ दिवस काम करत आहे. या टप्प्यात सर्व काळजी घेण्याच्या दृष्टीने आरोग्य विभागाने ११० कोरोटाईन बेड तयार ठेवले आहेत.

उपजिल्हा रुग्णालयात आयसोलेशन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्यात एकाच वेळी वीस रूग्णावर उपचार केले जाऊ शकतात. माञ ज्या व्यक्तींना कोरोना संक्रमित झाला आहे  अशाच रूग्णांना त्या कक्षात ठेवले जाणार आहे. तसेच कोरोना बाधित  रूग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीसाठी आणि संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभागाने शहरातील अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह तसेच तहसील रोडवरील मागासवर्गीय मुलींचे वसतीगृहाची इमारत ताब्यात घेतली आहे.

या दोन्ही वसतिगृहात तब्बल ११० खाटांची व्यवस्था होणार आहे. तसेच गरज भासल्यास तहसील रोडवरील मुलांचे वसतिगृह ही ताब्यात घेतले जाऊ शकते. दुबई,  अमेरिका,  रशिया आदी  परदेशातून  सेलू शहर व परिसरात  परतलेल्या सर्व व्यक्तीची तपासणी करण्यात आली आहे. त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी त्यांना हातावर शिक्के मारून  घरातच क्वारंटाईन करण्याची सुचना देण्यात आली आहे. 

उपजिल्हा रुग्णालयात ४५ कर्मचारी करत आहेत काम

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील डाॅक्टर सह ४५ कर्मचारी आणि आरोग्य सेवक दिवस राञ सेवा देत आहेत. परिस्थिती लक्षात घेऊन आयसोलेशन विभागात तिन शिफ्ट मध्ये काम सुरू आहे. तसेच नेहमीत पणे बाहय रूग्ण आणि अंतर विभागात सेवा दिली जात आहे. तसेच परदेशातून परतलेल्या व्यक्तीची माहिती घेऊन आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. ग्रामीण भागातून गावी परतलेल्या काही ग्रामस्थांची तपासणी केली जात आहे. 

- डाॅ संजय हरबडे वैघकीय अधिक्षक , सेलू 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी