शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus In Parbhani : सामान्य रूग्णांना दिलासा; आरोग्य विभागाच्या निर्देशानंतर पुन्हा खाजगी दवाखाने झाले सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 15:47 IST

लॉकडाऊननंतर खाजगी दवाखाने बंद होती

सेलू: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आल्या नंतर शहरातील काही खाजगी डाॅक्टरांनी दवाखाने बंद ठेवली होती. माञ जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उपजिल्हा रुग्णालयाचे वैघकीय अधिक्षक डाॅ संजय हरबडे यांनी गुरूवारी उशीरा शहरातील सर्व खाजगी  डाॅक्टरांना दवाखाने सुरू करण्याची सुचना दिल्यानंतर शुक्रवारी बंद असलेले दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. 

कोरोना विषाणूचा फैलाव होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून प्रशासन तसेच आरोग्य विभाग  युध्द पातळीवर काम करत आहे. शहर आणि ग्रामीण भागातील आरोग्य विभागाची यंञणा मोठ्या हिंमतीने कोरोनाशी लढा देत आहेत. परिस्थिती लक्षात घेऊन शहरातील काही खाजगी डाॅक्टरांनी आपली ओपीडी सुरू ठेवली होती. माञ काही खाजगी डाॅक्टरांची ओपीडी बंद असल्याने गरजू रूगणांची  गैरसोय होत होती. त्यामुळे रूग्णाच्या नातेवाईकांनी प्रशासनाकडून  विचारणा केली जात होती. मधुमेह,  हदयविकार, बालरोग तज्ञ, स्ञीरोग, आयुवैदीक, जनरल फिजिशन, होमिओपॅथी, दंत विकार, कान ,नाक, घसा, नेञरोग तज्ञांनकडे तपासणी करण्यासाठी रूग्ण येत असतात. माञ काही तज्ञांनी आपले खाजगी दवाखाने बंद ठेवली होती. त्यामुळे रूग्ण हवालदल झाले होते. उपजिल्हा रुग्णालयात कोरोनासाठी विशेष कक्ष, आणि बाहेर गावाहून परतलेल्या नागरिकांची तपासणी करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा उभी केली आहे.  मधुमेह, हदय रोग हे रूग्णालयात उपलब्ध नाहीत. परिणामी शहरातील या आजाराचे रूग्ण नियमित तपासणी  आणि ञास झाल्यानंतर ज्या डाॅक्टराकडे नियमित तपासणी करण्यासाठी  आणी सल्ला घेण्यासाठी या तज्ञांनकडे येतात. लाॅक डाऊन नंतर शहरातील काही खाजगी डाॅक्टर यांनी ओपीडी बंद केली होती. माञ जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार शुक्रवारी सकाळ पासून  बंद ठेवलेली दवाखाने सुरू करण्यात आली आहेत. यामुळे रूग्णांना मोठा दिलासा मिळाला असला तरी लाॅकडाऊन संपेपर्यंत ही सेवा नियमित स्वरूपात चालू ठेवणे आवश्यक आहे. 

 

खाजगी डाॅक्टर यांनी नियमित सेवा द्यावी शहरातील काही खाजगी दवाखाने लाॅकडाऊननंतर बंद असल्याचे नागरिकांची तक्रार होती. हदय रोग, मधुमेह, नेञरोग आणि अस्थीरोग तज्ञांनची दवाखाने सुरू नसल्याचे दिसून आले होते. आपत्कालीन स्थिती लक्षात घेऊन जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार  गुरूवारी शहरातील सर्व खाजगी दवाखाने सुरू करण्याची सुचना देण्यात आली आहे. शुक्रवारी बंद असलेली अनेक खाजगी दवाखाने सुरू झाले आहेत. ज्यांना सुचना देऊनही दवाखाने बंद ठेवली आहेत. अशांचे अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवले जाणार आहेत. -  डॉ. संजय हरबडे,वैद्यकीय अधीक्षक 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसparabhaniपरभणी