गोदावरी पात्रात पोहण्यास गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 06:11 PM2019-05-30T18:11:28+5:302019-05-30T18:11:28+5:30

पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला़

Class 10th student death in Godavari basin at Manwat | गोदावरी पात्रात पोहण्यास गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

गोदावरी पात्रात पोहण्यास गेलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

Next

मानवत (परभणी ) : रामपुरी बु़ येथील  गोदावरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एका १६ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ३० मे रोजी सकाळी १० वाजता घडली़ ज्ञानेश्वर बाळासाहेब यादव असे मयत मुलाचे नाव आहे़ 

रामपुरी बु़ येथील काही मुले ३० मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास गावातील मंदिर परिसरात गोदावरीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले होते़ त्यात ज्ञानेश्वर यादव हा देखील पोहण्यासाठी गेला; परंतु, त्याला पाण्याचा अंदाज आला नाही आणि तो खोल पाण्यात बुडाला़ ज्ञानेश्वर यादव याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती़ पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे़

Web Title: Class 10th student death in Godavari basin at Manwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.