शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविरचा काळाबाजार; परिचारिकेसह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:17 IST

कोरोनाबाधितांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे हे इंजेक्शन काळ्याबाजारात १५ ते ...

कोरोनाबाधितांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिविर इंजेक्शनचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे हे इंजेक्शन काळ्याबाजारात १५ ते २० हजार रुपयांना विकले जात आहे. या पार्श्वभूमीवर परभणी येथे हा काळाबाजार सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार सपोनि व्यंकटेश आलेवार यांनी सापळा रचला. त्यानुसार पोलीस शिपाई संतोष सानप यांना बनावट ग्राहक म्हणून एका व्यक्तीला या इंजेक्शनची विचारणा केली असता त्याने १५ हजार रुपयांना १ या प्रमाणे ३० हजार रुपयांना २ इंजेक्शन देण्याचे कबूल केले. त्यानंतर संबंधिताने पोलीस कर्मचारी सानप यांना शहरातील नांदखेडा रोड भागात येण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. मंगळवारी दुपारी ३.१० च्या सुमारास सदरील व्यक्ती बेलेश्वर मंदिराजवळ पाई आला. त्यानंतर इंजेक्शनविषयी बोलू लागला. यावेळी पोलिसांनी झडप घालून त्याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव दत्ता शिवाजी भालेराव (नर्सिंग स्टाफ, डेंटल कॉलेज, परभणी) असे सांगितले. यावेळी त्याची झडती घेतली असता त्याच्या जवळ २ रेमडेसिविर इंजेक्शन व १ मोबाइल आढळून आला. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने हे इंजेक्शन आपण जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिका नीता केशव काळे हिच्याकडून प्रत्येकी १२ हजार रुपयास १ विकत घेतले असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी परिचारिका नीता काळे हिला ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने जिल्हा परिषदेच्या कोविड केअर सेंटरमध्ये कर्तव्यावर असताना ७ रेमडेसिविर इंजेक्शन चोरल्याची कबुली दिली. तिच्या रूमची झडती घेतली असता रोख ७५ हजार रुपये व १ मोबाइल आढळून आला. याबाबत औषधी निरीक्षक बळीराम मरेवाड यांच्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.