बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:08 IST2021-01-24T04:08:40+5:302021-01-24T04:08:40+5:30

परभणी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रभक्तीने ओतप्रोत असणारे व्यक्तिमत्त्व होते़ कोणत्याही क्षेत्रातील अडलेल्या माणसाला त्यांच्याकडे न्याय मिळत ...

Balasaheb Thackeray's thoughts are inspiring | बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी

बाळासाहेब ठाकरे यांचे विचार प्रेरणादायी

परभणी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राष्ट्रभक्तीने ओतप्रोत असणारे व्यक्तिमत्त्व होते़ कोणत्याही क्षेत्रातील अडलेल्या माणसाला त्यांच्याकडे न्याय मिळत असे. राष्ट्रभक्ती हा बाळासाहेबांचा श्वास होता़ त्यामुळेच त्यांचे विचार युवकांना सदैव प्रेरणादायी ठरणारे आहेत, असे प्रतिपादन आ.डॉ.राहुल पाटील यांनी केले़

शहरातील शिवाजीनगर येथील तोरणा संपर्क कार्यालयात शनिवारी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा घेण्यात आली़ याप्रसंगी आ.डॉ.पाटील बोलत होते़ यावेळी जिल्हा सहसंपर्क प्रमुख डॉ.विवेक नावंदर, माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, उपजिल्हा प्रमुख संजय गाडगे, सदाशिव देशमुख, तालुका प्रमुख नंदकुमार आवचार, ज्ञानेश्वर पवार, नगरसेवक चंदू शिंदे, प्रशास ठाकूर, सुशील कांबळे, अनिल डहाळे, नवनीत पाचपोर, बाळराजे तळेकर, विशू डहाळे, मारोती तिथे, संभानाथ काळे, राहुल खटिंग, मकरंद कुलकर्णी, दिलीप गिराम, गणेश मुळे, केदार दुधारे, सूरज ढोके, स्वप्नील भारती, रोहित पदमवार, बालाजी हिरवे, गजानन शहाणे, अनिल झांबरे, सुभाष जोंधळे, अमोल गायकवाड, गौतम भराडे, माऊली साळवे, राहुल कांबळे, रोहन कांबळे, अरविंद देशमुख, महेश इंगळे, अंबिका डहाळे, मंगल कासले, वंदना कदम, कविता नांदुरे, सविता मठपती, नीता बंडेवार, शंकुतला चव्हाण आदींची उपस्थिती होती.

Web Title: Balasaheb Thackeray's thoughts are inspiring