खळबळजनक! कॉलेज उघडताच आवारात आढळला प्राध्यापकाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 17:24 IST2022-11-10T17:23:56+5:302022-11-10T17:24:33+5:30
मृत प्राध्यापक मागील काही दिवसांपासून कौटुंबिक कलाहामुळे मानसिक दडपणाखाली असल्याची माहिती आहे

खळबळजनक! कॉलेज उघडताच आवारात आढळला प्राध्यापकाचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह
जिंतूर ( परभणी) : येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये कार्यरत प्राध्यापकाचा तंत्रनिकेतनच्या आवारातच आज सकाळी ११ वाजता संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळ्याने खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे.
जगदीश ज्ञानोबा गव्हाणे ( 45, रा. लातूर) असे मृताचे नाव आहे. ते येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये इलेक्ट्रॉनिक विषय शिकवत. मुळचे लातूर येथील गव्हाणे शहरात भाड्याच्या घरात राहत. आज सकाळी 11 वाजता महाविद्यालय सुरू झाल्यानंतर गव्हाणे यांचा मृतदेह आवारात आढळून आला. तत्काळ याची माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळावर दारूच्या बाटल्या आढळल्या आढळले आल्या आहेत. प्रा. गव्हाणे यांचा अतिमधप्राशन केल्याने किंवा हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला असावा असा अंदाज आहे. तसेच प्रा. गव्हाणे मागील काही दिवसांपासून कौटुंबिक कलाहामुळे मानसिक दडपणाखाली असल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक दीपक दंतुलवार महिला कर्मचारी लीला जोगदंड, शंकर हाके, अनिल शिंदे आदींनी पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.