मूलभूत सुविधांसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:21 IST2021-08-23T04:21:12+5:302021-08-23T04:21:12+5:30

शहरात वाढलेली अनधिकृत बांधकामे, बॅनर, होर्डिंग्ज, टॉवरवर कारवाई करणे, नळ जोडणी, कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाचे मार्गदर्शन, सार्वजनिक ठिकाणी अंतर ...

Appointment of Officer for Basic Facilities | मूलभूत सुविधांसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती

मूलभूत सुविधांसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती

शहरात वाढलेली अनधिकृत बांधकामे, बॅनर, होर्डिंग्ज, टॉवरवर कारवाई करणे, नळ जोडणी, कोविड प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाचे मार्गदर्शन, सार्वजनिक ठिकाणी अंतर राखणे़, प्रतिबंधक उपाययोजना करणे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत करावयाची कामे व मालमत्ता वसुली कर, लोकसेवा हक्क अधिनियमाची अंमलबजावणी आदी कामांसाठी नोडल अधिकारी तथा नियंत्रण अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त प्रभाग समिती अ, प्रभाग समिती ब, प्रभाग समिती क, उपायुक्त यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच अद्ययावत शासन निर्णय, महापालिका सर्वसाधारण सभा व स्थायी समिती सभा, प्रभाग समिती सभा, वाॅर्ड समितीनिहाय कामे वेळेत होण्यासाठी सहायक आयुक्त व प्रभाग कार्यालय यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी अतिरिक्त आयुक्त, दोन उपायुक्त यांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे आदेश आयुक्त देविदास पवार यांनी काढले आहेत़

Web Title: Appointment of Officer for Basic Facilities