शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

कमालच झाली ! शेती नावावर नसतानाही मिळाली पीक कर्जमाफी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 20:19 IST

नावावर कोणत्याही प्रकारची शेती नसून महिला भूमिहीन आहेत.

ठळक मुद्दे महिलेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार बँक अधिकाऱ्यांची कर्जमाफीवर चुप्पी

पालम : नावावर जमीन नसताना व बँकेकडून कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतलेले नसतानाही राज्य शासनाच्या कर्जमाफी यादीत नाव येऊन ८७ हजार रुपयांचे कर्ज माफ झाल्याची तक्रार पालम तालुक्यातील तांदुळवाडी येथील एका महिलेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असून याबाबत पालम येथील बँकेच्या अधिकाऱ्यांनी चुप्पी साधली आहे. 

पालम तालुक्यातील तांदुळवाडी येथील सूमनबाई भानूदासराव कदम यांच्या नावावर कोणत्याही प्रकारची शेती नसून त्या भूमिहीन आहेत. शिवाय त्यांनी कोणत्याही बँकेकडून कर्ज घेतलेले नाही. असे असताना राज्य शासनाच्या महात्मा जोतीराव फुले कर्ज माफी योजनेत त्यांचे नाव आले असून त्यांना कर्जमाफी मिळाली असल्याची माहिती समजली. त्यानंतर त्यांनी पालम येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत जावून पाहणी केली असता तांदुळवाडी येथील कर्ज माफीच्या यादी क्रमांक १२९ मधील विशिष्ट क्रमांक २२५५०४४७३९ व कर्ज खाते क्रमांक ३७५४२८६३७५१ या खात्यावरील ८७ हजार ६६ रुपयांचे कर्ज माफ झाले असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे यादीमध्ये त्यांच्या नावासमोर त्यांचा  ९९७८८५४७९३५७ हा आधार क्रमांक दर्शविण्यात आला आहे. ही यादी पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. आपण कोणत्याही प्रकारचे कर्ज घेतले नसताना कर्जमाफीच्या यादीत आपले नाव कसे काय आले व आपला आधार क्रमांक येथे कसा नोंदविला गेला, याची माहिती त्यांनी बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे विचारली असता त्यांनी याबाबत उत्तर दिले नाही. या प्रकरणी त्यांनी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली आहे. या अनुषंगाने प्रतिक्रियेसाठी सदरील प्रतिनिधीने भारतीय स्टेट बँक शाखेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. 

अन्यही काही शेतकऱ्यांच्या तक्रारीबँकेकडून कर्ज घेतलेले नसतानाही शासनाच्या कर्जमाफीच्या यादीत नाव येऊन कर्जाची रक्कम माफ झाल्याचा प्रकार तालुक्यातील अन्यही काही शेतकऱ्यांबाबत घडला आहे. याबाबत शेतकरी बँकेच्या अधिकाऱ्यांकडे तक्रारी करीत आहेत; परंतु, या तक्रारीबाबत बँक अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत. त्यामुळे कर्ज घेतले नसतानाही यादीमध्ये नाव येते कुठून व आधार ओळखपत्र दिले नसतनाही त्याचा क्रमांक कोठून येतो, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन भूमिहीन व्यक्तींच्या नावावर तसेच कर्ज नसलेल्या शेतकऱ्यांच्या नावावर कर्जमाफीची रक्कम कशी जमा होत आहे, याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेतीbankबँक