शेतक-यांच्या पैशांवर अंबानींनी घातला दरोडा, परभणीत राजू शेट्टी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 03:29 PM2018-07-08T15:29:57+5:302018-07-08T15:31:10+5:30

शेतक-यांना विमा परतावा न देणा-या अनिल अंबानी यांनी शेतक-यांच्या पैशांवर दरोडा घातल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. 

The allegations made by Ambani on the payment of farmers' money, Raju Shetty in Parbhani | शेतक-यांच्या पैशांवर अंबानींनी घातला दरोडा, परभणीत राजू शेट्टी यांचा आरोप

शेतक-यांच्या पैशांवर अंबानींनी घातला दरोडा, परभणीत राजू शेट्टी यांचा आरोप

परभणी- कृषी आणि महसूल विभागातील अधिका-यांच्या सहाय्याने शेतक-यांकडून विम्यापोटी कोट्यवधी रुपये जमा करून शेतक-यांना विमा परतावा न देणा-या अनिल अंबानी यांनी शेतक-यांच्या पैशांवर दरोडा घातल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी येथे केला.

पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांनी रिलायन्स पीक विमा कंपनीविरूद्ध १३ दिवसांपासून आंदोलन उभे केले आहे़ खा़ राजू शेट्टी यांनी रविवारी या आंदोलकांची भेट घेतली़ शेतकºयांच्या पाठीशी असल्याचे सांगतानाच शेट्टी म्हणाले, पीक विम्या संदर्भात माझ्याकडे अनेक तक्रारी आल्या असून, पुराव्यासह मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही नोंदविली आहे़.

परंतु, राज्य शासनातील मंत्री अंबानी यांच्या कार्पोरेट कंपनीसमोर गुडघे टेकत आहेत़ हा देश कार्पोरेट कंपनीला  गहान ठेवल्याचा आरोपही त्यांनी केला़ रिलायन्स कंपनीने अनेक बोगस पंचनामे करून शेतक-यांच्या हक्काचा परतावा दिला नाही़ देशभरातून ९ हजार ४१ कोटी रुपये रिलायन्स विम्यापोटी जमा केले आणि परतावा मात्र केवळ ८१२ कोटी रुपयांचाच दिला आहे़ त्यामुळे ही प्रधानमंत्री पीक विमा नसून अंबानी कल्याण योजना असल्याचेच दिसत आहे़.

शेतक-यांचे कोट्यवधी रुपये लुटणाºया अंबानींच्या रिलायन्स कंपनीवर कारवाई करण्याऐवजी आंदोलन करणाºया शेतकºयांवर तांत्रिक मुद्दे काढून गुन्हे दाखल केले जात आहेत़ सत्ताधारी अंबानींना का सांभाळत आहेत़ अंबानींचा एवढा दरारा का ? असा सवाल करीत येत्या आठ दिवसांत परभणीतील पीक विमा प्रश्नी शेतकºयांना न्याय न दिल्यास अंबानींच्या घरावर मोर्चा काढण्याचा इशारा खा़ राजू शेट्टी यांनी दिला़ यावेळी कॉ़ राजन क्षीरसागर, जि़प़ सदस्य श्रीनिवास जोगदंड, स्वाभिमानी संघटनेचे माणिक कदम, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे आदींची उपस्थिती होती़

Web Title: The allegations made by Ambani on the payment of farmers' money, Raju Shetty in Parbhani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.