शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

अत्याचार करून पिडीतेला केले ब्लॅकमेल; तक्रारीनंतर आरोपी तिसऱ्या दिवशी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 2:27 PM

rape case in Parabhani : आरोपी गंगाखेडमधील प्रतिष्ठित सराफा व्यापाऱ्याचा मुलगा आहे.

ठळक मुद्देशेजारी राहणाऱ्या विवाहितेवर अत्याचार

गंगाखेड ( परभणी ) : शेजारी राहणाऱ्या २१ वर्षीय विवाहितेवर अत्याचार करून त्याचे फोटो काढून ब्लॅकमेल करणाऱ्या नराधाम आरोपीस पोलिसांनी आज पहाटे अटक केली. रोहित पंडित ( ३५ ) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी शहरातील प्रतिष्ठित सराफा व्यापाऱ्याचा मुलगा असल्याने शहरात खळबळ उडाली आहे. त्याच्या विरोधात बुधवारी ( दि. १३ ) पिडीतेने गंगाखेड पोलिसात अत्याचाराची तक्रार दिली होती.

पिडीतेच्या तक्रारीनुसार, शहरातील नगरेश्वर गल्लीत रोहित पंडित आणि पिडीता राहते. रोहितने दि. ८ जून आणि दि. २२ जुलै २०२१ रोजी स्वतःच्या घरात पिडीतेवर अत्याचार केला. यावेळी आरोपीने फोटो देखील काढले. त्यानंतर फोटो पतीला दाखविण्याचे धमकी देत ब्लॅकमेल केले. याप्रकरणी पिडीतेने बुधवारी ( दि. १३ ) गंगाखेड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली. त्यानंतर तब्बल तीन दिवसांनी पोलिसांनी आरोपीस आज पहाटे अटक केली. 

पाथरीत देशी बनावटीचे पिस्टल बाळगणारे दोघे ताब्यातगणेश छत्रभुज खुडे आणि प्रताप बाजीराव इंगळे ( रा बोरगव्हान ता पाथरी ) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, परभणी येथील स्थानिक गुन्हा शाखेचे पथक १३ ऑक्टोबर रोजी अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी पाथरी येथे आले होते. दरम्यान, रात्री ८ वाजेच्या सुमारास या पथकाला आष्टी फाटा टी-पॉईंट जवळ दोघेजण देशी पिस्टल बाळगून असल्याची  गुप्त माहिती  मिळाली. या माहितीवरून पाथरी येथील पोलीस उपनिरीक्षक जी. एन. कराड आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने आष्टी फाटा टी पॉईंट येथे रात्री ९.३० वाजेच्या सुमारास धाड टाकून आरोपींना ताब्यात घेतले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीparabhaniपरभणी