शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी सरकारचा कारभार बेशिस्तपणे चाललाय : भागवत कराड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 14:31 IST

Bhagwat Karad : नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले असले तरी मोदींवर टीका करण्याइतकी त्यांची उंची नाही

परभणी : राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा कारभार बेशिस्तपणे चालला असून, तीन पक्षांची मर्जीत राखत हे सरकार टिकविण्याची कसरत केली जात आहे, असा आरोप केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड ( Bhagwat Karad ) यांनी येथे केला. ( The administration of the state has run erratically : Bhagwat Karad )

भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने केंद्रीय राज्यमंत्री कराड येथे आले होते. गुरुवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन यात्रेचा हेतू स्पष्ट केला. यावेळी आमदार मेघना बोर्डीकर, माजी आमदार मोहन फड, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, महानगर अध्यक्ष आनंद भरोसे आदींची उपस्थिती होती. 

डॉ. कराड म्हणाले, राज्य शासनाने पीक विम्याचे सर्वेक्षण करण्यासाठी चुकीची एजन्सी नेमल्याने शेतकरी विम्याच्या लाभापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे यापुढील काळात डिजिटल सर्वेक्षण करण्याची पद्धत लागू करता येईल का? या संदर्भाने विचार सुरू आहे. परभणीतील मेडिकल कॉलेजसाठी केंद्राकडून दिल्या जाणाऱ्या परवानग्या वेळेत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी कराड यांनी पालकमंत्री नवाब मलिक, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana Patole ) यांच्यावर टीका केली. पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले असले तरी मोदींवर टीका करण्याइतकी त्यांची उंची नसल्याचे डॉ.कराड म्हणाले. 

परभणीचे पालकत्व घेऊन काम करेल, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. जिल्ह्यातील बंद असलेले सीसीआयचे केंद्र, राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा वाढविणे, मुद्रा लोनचे वाटप आदी प्रश्न सोडवू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Bhagwat Karadडॉ. भागवतBJPभाजपाparabhaniपरभणीNana Patoleनाना पटोले