शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

परभणीतील कृषि विद्यापीठात सहा राज्यातील शेतकरी, तज्ञांचा मेळावा

By राजन मगरुळकर | Updated: February 15, 2024 19:51 IST

वनामकृवित पश्चिम विभागीय कृषि मेळावा, कृषी प्रदर्शनी

परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि परभणी आत्मा, कृषि विभागाच्या संयुक्त विद्यमाने कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्रालय, नवी दिल्ली पुरस्कृत पश्चिम विभागीय कृषि मेळावा आणि कृषि प्रदर्शनीचे आयोजन २१,२२, २३ फेब्रुवारीला विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात केल्याची माहिती कुलगुरू डॉ.इन्द्र मणि यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ.धर्मराज गोखले, शिक्षण संचालक डॉ.उदय खोडके, जिल्हा माहिती अधिकारी अरूण सुर्यवंशी आदींसह विद्यापीठाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

कुलगुरू डॉ.इन्द्र मणि म्हणाले, मेळाव्यात पश्चिम भारताच्या महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गोवा यासह दीव-दमन, दादरा- नगर हवेली येथील शेतकरी, कृषी तज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, कृषि कंपनी, कृषि अधिकारी, विस्तारक आणि कृषि उद्योजक सहभागी होणार आहेत. मेळाव्यास देशातील आणि राज्यातील मंत्री महोदयांना आमंत्रित केले आहे. मेळाव्याचा मुख्य विषय ‘हवामान-अनुकूल शाश्वत शेतीद्वारे शेतकऱ्यांची समृद्धी’ आहे. यात चर्चासत्र, शास्त्रज्ञ-शेतकरी संवाद व तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्याचे उदघाटन २१ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजता होणार आहे. राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंढे हे २३ फेब्रुवारीला समारोपीय कार्यक्रमास विशेष अतिथी असुन उदघाटन कार्यक्रमास राज्य कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी पीक प्रात्यक्षिक भेटी आणि खाद्य महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. कृषि मेळावा, प्रदर्शनीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कुलगुरू डॉ.इन्द्र मणि आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले यांनी केले.

दोनशेहून अधिक दालन राहणारशेतकरी मेळावा, कृषि प्रदर्शनी माध्यमातुन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील नाविण्यपूर्ण कृषि तंत्रज्ञान, कृषि संशोधन पाहण्याची सुवर्ण संधी शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. कृषि प्रदर्शनीत अद्ययावत कृषि तंत्रज्ञानावर आधारित विविध सार्वजनिक संस्था, खासगी कंपन्या, अशासकीय संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या आणि बचत गट यांच्या २०० पेक्षा जास्त दालनाचा समावेश आहे. यात विषशेत: दर्जेदार बी-बियाणे, रोपे, खत, किटकनाशके, कृषि औजारे, कृषी निविष्ठा, डिजिटल तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान, आधुनिक सिंचन पध्दती, पशुधन इत्यादी दालनांचा समावेश राहील.

टॅग्स :parabhaniपरभणीAgriculture Sectorशेती क्षेत्र