पालम येथे चोरट्यांकडून ६ दुचाकी जप्त; अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2018 12:07 IST2018-09-20T12:06:59+5:302018-09-20T12:07:52+5:30
अटकेतील चोरट्यांच्या चौकशीतून शहरात मागील दोन महिन्यात चोरीस गेलेल्या सहा दुचाकी पोलिसांना सापडल्या आहेत.

पालम येथे चोरट्यांकडून ६ दुचाकी जप्त; अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
पालम (परभणी ) : अटकेतील चोरट्यांच्या चौकशीतून शहरात मागील दोन महिन्यात चोरीस गेलेल्या सहा दुचाकी पोलिसांना सापडल्या आहेत. 17 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आलेल्या 8 चोरट्यांना पोलिसी हिसका दाखवताच अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.
पालम शहरात दकानापुढे रस्त्यावर उभ्या केलेल्या, घरातून दुचाकी चोरीस जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. याप्रकरणी पोलीसात दुचाकी चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. 17 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता स्थानीक गुन्हा शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करीत आठ चोरट्यांना ताब्यात घेतले होते. यानंतर पोलीसी खाक्या दाखवताच अनेक गुन्हे या आरोपींनी कबूल केले.
यातूनच सहा दुचाकी चोरट्यांकडून जप्त करण्यात आल्या. या पैकी तीन दुचाकी पालम शहरातून तर तीन दूचाकी शेजारच्या लोहा शहरातून चोरल्या गेल्या आहेत. तसेच पेठशिवणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी सुतगिरणीतून रोहीत्रा मधील चोरलेले दहा किलो ताम्बे व पान पटीतील साहीत्य मिळविण्यात पोलीसाना यश आले आहे. पोलीस कोठडीत चोरटे असल्याने अजून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.