४ आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:22 IST2020-12-30T04:22:32+5:302020-12-30T04:22:32+5:30

मुंबई येथील डाॅ. उज्ज्वला बोराडे यांना सुनीता भोसले हिने ३० हजार रुपये प्रतितोळ्याप्रमाणे सोने देते म्हणून २५ डिसेंबर रोजी ...

4 accused remanded in police custody for 5 days | ४ आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

४ आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

मुंबई येथील डाॅ. उज्ज्वला बोराडे यांना सुनीता भोसले हिने ३० हजार रुपये प्रतितोळ्याप्रमाणे सोने देते म्हणून २५ डिसेंबर रोजी सेलू येथे बोलावून घेतले. त्यानंतर एका शेतात नेऊन मारहाण करीत रोख ८ लाख रुपये, मोबाइल असा ८ लाख २१ हजार रुपयांचा ऐवज लुटला होता. याप्रकरणी सविता भोसलेसह ८ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि सेलू पोलिसांच्या पथकाने तालुक्यातील जवळा जिवाजी येथून सुनीता भोसले आणि मंजिरी सुखवास शिंदे या दोन महिलांना, तर सोनपेठ तालुक्यातील शेळगाव येथून शैलेश शिंदे, श्रीनाथ भोसले यांना रविवारी पहाटे ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख ५ लाख ५ हजार रुपये हस्तगत केले होते. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना सेलू पोलिसांनी न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक विजय रामोड यांनी दिली.

Web Title: 4 accused remanded in police custody for 5 days