२१ जणांचा मृत्यू; ५१२ बाधितांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:18 IST2021-04-22T04:18:02+5:302021-04-22T04:18:02+5:30

परभणी : जिल्ह्यात बुधवारी उपचार घेत असलेल्या २१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, ५१२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. परभणी ...

21 killed; Increase of 512 victims | २१ जणांचा मृत्यू; ५१२ बाधितांची वाढ

२१ जणांचा मृत्यू; ५१२ बाधितांची वाढ

परभणी : जिल्ह्यात बुधवारी उपचार घेत असलेल्या २१ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून, ५१२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

परभणी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली, तरी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण मात्र वाढलेलेच आहे. रविवार व सोमवार या दोन दिवसात ४८ जणांचा मृत्यू झाला तर मंगळवारी १८ जणांचा मृत्यू झाला. बुधवारीही २१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामध्ये आयटीआय येथील शासकीय रुग्णालयातील ८ महिला व ७ पुरुष अशा १५ जणांचा तर उर्वरित ६ जणांचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. त्यामध्ये ४ पुरुष व दाेन महिलांचा समावेश आहे. गुरुवारी प्राप्त झालेल्या २ हजार ३७४ आरटीपीसीआर अहवालांपैकी ५१२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत तसेच ६८४ जणांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत जिल्ह्यात २७ हजार ८१० कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, त्यातील २१ हजार ३८८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ७१० जणांचा मृत्यू झाला असून, सद्यस्थितीत विविध आरोग्य संस्थांमध्ये ५ हजार ७१२ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामध्ये आयटीआय हॉस्पिटलमध्ये १८१, जिल्हा रुग्णालयात २१९, जिल्हा परिषद कोविड केअर सेंटरमध्ये २७६ तर गृह अलगीकरणामध्ये ४ हजार १८२ रुग्ण उपचार घेत आहेत. उर्वरित रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

Web Title: 21 killed; Increase of 512 victims