मंगळवारी जिल्ह्यात १५ रुग्णांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:16 IST2021-04-14T04:16:16+5:302021-04-14T04:16:16+5:30
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना बाधित रुग्णांच्या मृत्यूने चिंता वाढविली आहे. १३ एप्रिल रोजी १५ ...

मंगळवारी जिल्ह्यात १५ रुग्णांचा मृत्यू
परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना बाधित रुग्णांच्या मृत्यूने चिंता वाढविली आहे. १३ एप्रिल रोजी १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ५३२ नवे रुग्ण दाखल झाले आहेत.
जिल्ह्यात मागील दोन आठवड्यांपासून बाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. दररोज १५ ते २० रुग्णांचा कोरोनाने मृत्यू होत आहे. मंगळवारी शासकीय रुग्णालयातील नऊ आणि खासगी रुग्णालयातील सहा अशा १५ रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्या रुग्णांमध्ये १० पुरुष आणि पाच महिलांचा समावेश आहे. जिल्ह्यातील मृत्युदर वाढत असल्याने नवी चिंता निर्माण झाली आहे.
बाधित रुग्णांची संख्याही दररोज वाढत असल्याने या रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य यंत्रणा आणखी सक्षम करण्याची गरज निर्माण झाली आहे. मंगळवारी एक हजार ४२० नागरिकांचे अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले. त्यात आरटीपीसीआरच्या ५९५ अहवालांमध्ये २६६ आणि रॅपिड टेस्टच्या ८२५ अहवालांमध्ये २६६ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता २१ हजार ६५४ झाली आहे. त्यांपैकी १६ हजार ४२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून ५५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४ हजार ६६८ रुग्ण उपचार घेत आहेत.
शहरातील जिल्हा रुग्णालयात ६७, आयटीआय हॉस्पिटलमध्ये १५४, जिल्हा परिषदेच्या कोविड हॉस्पिटलमध्ये २२३, अक्षदा मंगल कार्यालयात १३० रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे ३ हजार ५५० रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. खासगी रुग्णालयातही उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने खासगी रुग्णालयांमध्ये बेड कमी झाले आहेत. बेडसाठी रुग्णांची धावपळ होत आहेत.
३६७ रुग्णांची कोरोनावर मात
जिल्ह्यातील ३६७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मागील तीन दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने जिल्हावासीयांना अल्पसा दिलासा मिळाला आहे. ३६७ रुग्णांना मंगळवारी सुट्टी देण्यात आली.