परभणी जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे १४७ रुग्ण; दोघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 14:40 IST2021-03-16T14:40:23+5:302021-03-16T14:40:57+5:30

मागील महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग उफाळून आला आहे.

147 corona patients in Parbhani district on Monday; Death of both | परभणी जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे १४७ रुग्ण; दोघांचा मृत्यू

परभणी जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे १४७ रुग्ण; दोघांचा मृत्यू

परभणी : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला वाढला असून, १५ मार्चला विक्रमी १४७ रुग्णांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे दोघांचा मृत्यू झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मागील महिनाभरापासून जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग उफाळून आला आहे. सोमवारी सर्वाधिक १४७ रुग्णांची नोंद झालेल्या झाली आहे. शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या २ पुरुष रुग्णांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्ह्यात एकूण ९ हजार ४२१ रुग्ण संख्या झाली असून, त्यापैकी ८ हजार ६२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ३४५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, सध्या ४५१ रुग्ण उपचार घेत आहेत.
 

Web Title: 147 corona patients in Parbhani district on Monday; Death of both