शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
2
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
3
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
4
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
5
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
6
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
7
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
8
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
9
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
10
“अरविंद केजरीवाल महिलाविरोधी, PM मोदींवरील विश्वासामुळेच भाजपासोबत”: स्वाती मालीवाल
11
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
12
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
13
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
14
"आता हा दिग्दर्शन करणार, बघू काय दिवे लावतो...", रितेशने सांगितली दिग्दर्शनाच्या निर्णयामागची गोष्ट
15
"ते फोटो पूर्णपणे खोटे", आपचा भाजपावर पलटवार; आतिशी आणि संजय सिंह यांचं थेट आव्हान
16
“छत्रपती शिवाजी महाराज अन् रामदास स्वामींचा कालखंड वेगळा, संदर्भ जोडू नका”: हर्षवर्धन सपकाळ
17
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
18
ई-कॉमर्सच्या युगात व्हा 'डिजिटल दुकानदार'; संपूर्ण देश बनू शकतो तुमचा ग्राहक! 'असे' बनू शकता Amazon-Flipkart वर सेलर
19
प्रेग्नंसी फोटो शेअर करत सुप्रिया पिळगावकरांनी दिला आठवणींना उजाळा, म्हणाल्या...
20
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
Daily Top 2Weekly Top 5

निम्न दुधना प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 13:55 IST

निम्न दुधना प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडले असून नदीपात्रात २५ हजार २२३ क्युसेसने पाण्याचा विसर्ग केला जात आहे.  नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा  इशारा देण्यात आला आहे.

सेलू : परभणी जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक वाढली असून सोमवारी सकाळी धरणाचे पुन्हा ८ दरवाजे उघडले आहेत. सद्यस्थितीत प्रकल्पाचे १४ दरवाजे  उघडले असून नदीपात्रात  २५ हजार २२३ क्युसेसने  पाण्याचा विसर्ग केला जात आहे. त्यामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातील प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रकल्पात  पाण्याची आवक  अचानक  वाढली.  त्यामुळे रविवारी सकाळी प्रकल्पाचे चार दरवाजे ५० सेमीने उघडून नदीपाञात पाण्याचा विसर्ग केला गेला.  परंतू पाण्याची आवक  पुन्हा वाढल्याने साेमवारी सकाळी आणखी दरवाजे उघडण्याचा निर्णय घेण्यात आला.

चार मार्गावरील वाहतूकीवर परिणाम

निम्न दुधना प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने दुधना नदीला पुर आला आहे. हादगाव- केदारवाकडी,  सेलू- राजवाडी- वालूर, मानवत रोड- वालूर आणि सेलू- देवगावफाटा या मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे.

नदीकाठीवरील गावांना केले सतर्क 

दुधना नदीपात्रात सातत्याने पाण्याचा विसर्ग वाढविला जात असल्याने महसूल प्रशासनाने नदीकाठावरील पुर नियंत्रण रेषेवरील गावांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. ६० हजार क्युसेसने विसर्ग करण्याची वेळ आली तर आपत्कालीन परिस्थिती निर्माण हाेऊ शकते. त्यामुळे यंञणा सज्ज ठेवण्यात आली असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन असल्याचे तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले.

टॅग्स :parabhaniपरभणीDamधरणRainपाऊस