शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मन की बात

By admin | Updated: July 6, 2016 17:31 IST

सगळंच, कधीकधी चुकतं जातं.. काय होतंय नक्की कळत नाही, आपलंच आपल्याला कोडं उलगडत नाही.. मनाच्या तळघरात काहीतरी खूपत असतं..

सगळंच, कधीकधी चुकतं जातं..
काय होतंय नक्की कळत नाही,
आपलंच आपल्याला कोडं उलगडत नाही..
मनाच्या तळघरात काहीतरी
खूपत असतं..
आतल्या आत सलणाºया काट्यासारखं 
सारखं सलत असतं..
हातात घेऊन उकरावा तो काटा
तर अजून आत काहीतरी रुततं.
आत आत फसत..
नेमकं फसतंय काय, रुततंय काय
आणि सलतंय काय हेच कळत नाही
मन तेवढं उदास उदास..
काय होतंय नक्की कळत नाही..
**
असं होतं अनेकदा..
आपलं कोडं आपल्यालाच उलगडत नाही,
आपण नसतो कुणावर उदास,
रागही नसतो आलेला कुणाचा,
ना कुणावर कसला संशय,
ना कसला हेवा,
ना दुस्वास..
आपलं भांडणही नसतं आपल्याशी..
पण करमत नाही जणू आपल्याला,
आपल्यासोबतच..
आणि मग आपलं असं एकेकटं असणं,
आपलं आपल्यालाच छळतं..
इतकं सलतं की 
नको वाटावी आपलीच सोबत..
***
अशावेळी कुणाशी नी काय बोलणार?
जे आपल्यालाच कळलं नाही,
ते इतरांना कसं सांगणार?
म्हणून मग डोळे बंद करुन बसावं गप्प..
सांगावं स्वत:लाच,
स्वत:च्या मनालाच..
की असं अशक्त होऊन,
हिरमुसून,रुसून बसून
कसं कोडं सुटेल!
एकदा मोकळा वारा पिऊन येऊ,
चार पावलं भटकून येऊन..
आणि हसून घेऊ पोटभर..
***
उदासीचे आपले डोर आपणच
कापून टाकावेत आपल्यासाठी..
आणि मग कदाचित,
आपली उत्तरं आपल्याला गवसतील
आणि करमेल स्वत:लाच स्वत:सोबत..
स्वत:साठी!
**
 
( टॅलिन नावाच्या  एका ब्राझिलियन तरुण मुलीच्या मनातली ही घालमेल. तिच्या ब्लॉगवरुन, तिच्या सौजन्यानं, संपादित अनुवादासह)
-पूर्वप्रसिद्ध आॅक्सिजन २७ नोव्हेंबर २०१६