शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्टी’ला स्पीडचा डोस

By admin | Updated: October 2, 2014 20:00 IST

चीन आणि अमेरिकेनंतर सगळ्यात जास्त स्मार्टफोन यूर्जस हे भारतात आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे

- अनिल भापकर
anil.bhapkar@lokmat.com
 
चीन आणि अमेरिकेनंतर सगळ्यात जास्त स्मार्टफोन यूर्जस हे भारतात आहेत आणि ही संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. स्मार्टफोनच्या किमती या सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या आहेत. याला कारण म्हणजे अँण्ड्राईडमध्ये झालेली क्रांती. आपण आज स्मार्टफोन घेतला तर तो काही महिन्यांनी जुना वाटू लागतो. त्याचा परफॉर्मस हा खूप ‘लो’ झालेला असतो. आपल्याला आपल्याच स्मार्टफोनचा राग यायला लागतो. मात्र स्मार्टफोन घेतल्या दिवसांपासून आपण काही चांगल्या सवयी जर स्वत:ला लावून घेतल्या तर वर्षभरानंतरही तो अगदी नव्यासारखचं परफॉर्म करेल.
 
‘स्क्रीन’ची साफसफाई
कॉम्प्युटरच्या डेस्कटॉप स्क्रीनवर जास्त फाईल्स आणि फोल्डर्स ठेवले तर त्याचा स्पीड जसा कमी होतो. अगदी तसाच स्मार्टफोनच्या स्क्रीनवर सुद्धा ‘अँप’चे आयकॉन्स आणि विगेटस जास्त असले तर त्याचा स्पीड मंदावतो. त्यामुळे कुठले आयकॉन्स होम स्क्रीनवर ठेवावेत आणि कुठले काढून टाकावेत याचा रिव्ह्यू आपण दर दहा दिवसांनी घेतला पाहिजे. कारण फक्त स्पीडच कमी होतो असं नाही तर बॅटरी लाईफवरदेखील त्याचा परिणाम होतोच.
बिनाकामाचे अँप्स
अनेकांना नवनवीन अँप्स डाउनलोड करायची चटक लागते.  ते इन्स्टॉल केल्यानंतर कधी वापरलेही जात नाही. पण बॅकग्राउंडला ते नेहमी चालू असतात, त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनची बरीच एनर्जी त्यात खर्च होते. हे अँप्स  रेग्युलरली अपडेट डाउनलोड करीत असतात. त्यामुळे तुमचा इंटरनेट युजेसही वाढतो परिणामी खर्च तर वाढतो. त्यामुळे जे नको ते अँप्स बिंधास काढूनच टाका.
 
कॅश आणि कुकीज
जेव्हा तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर इंटरनेट सफर्र्ींग करता तेव्हा बराच बिनाकामाचा डेटा तुमच्या स्मार्टफोनच्या मेमरीमध्ये सेव्ह होत असतो, त्यामुळे नियमितपणे स्मार्टफोनची कॅश मेमरी क्लीन करायला पाहिजे. त्यासाठी अनेक चांगले मोफत अँप्ससुद्धा उपलब्ध आहेत जसे की क्लीन मास्टर. याचप्रमाणे तुमच्या स्मार्टफोनमध्ये कुकीजसुद्धा नियमितपणे सेव्ह होत असतात ज्या लक्षातदेखील येत नाही. त्यामुळे कुकीजसुद्धा नियमितपणे क्लीन करायला पाहिजे. यासाठीसुद्धा क्लीन मास्टर हे अँप चांगले आहे.
 
लाईव्ह वॉलपेपर्स
आपल्या स्मार्टफोनवर लाईव्ह वॉलपेपर्स टाकायची बर्‍याच जणांना भारी हौस असते. पण त्यामुळे तुमच्या स्मार्टफोनची बॅटरी तर डाऊन होतेच शिवाय परफॉर्मससुद्धा स्लो होतो.  त्यामुळे लाईव्ह वॉलपेपर्स शक्यतो वापरू नयेत.
 
मोबाइल सर्व्हिसेस
अनेकवेळा आपण मोबाइलच्या सर्व्हिसेस चालू तर करतो मात्र त्या परत बंद करायचा विसरून जातो. मोबाइल सर्व्हिसेस जसे की वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस, मोबाइल डेटा आदि यापैकी ज्या सर्व्हिसेसची गरज नसेल किंवा काम झाल्यास लगेच बंद करून टाकल्या पाहिजे, स्मार्टफोनची बरीच एनर्जी त्यामुळे वाचते.
 
रिबुट मस्ट
रिबुटिंग अर्थात तुमचा स्मार्टफोन रिस्टार्ट करणे. शक्य झाल्यास तुमचा स्मार्टफोन दिवसातून एकदा रिबुट केला पाहिजे. कारण, त्यामुळे बॅकग्राउंडला जे बिनाकामाचे अँप्स आणि सॉफ्टवेअर्स चालू असतात ते बंद होतात. बर्‍याचदा आपण काही अँप्स चालू केले आणि काम संपल्यानंतर बंद जरी केले तरी बॅकग्राऊंडला ते चालू असतात. त्यामुळे आपण दिवसातून एकदा स्मार्टफोन रिबुट केला पाहिजे.
 
स्मार्टफोन क्लिनिंग
आपण जो स्मार्टफोन वापरतो तो स्वच्छ आणि निटनेटका दिसायला पाहिजे, त्यामुळे आठवड्यातून एकदा स्मार्टफोनचे कव्हर काढून स्मार्टफोन व कव्हर स्वच्छ करायला पाहिजे. त्याचप्रमाणे स्क्रीनसुद्धा स्वच्छ करायला पाहिजे. तांत्रिक काळजी एवढीच स्मार्टफोनची स्वच्छतासुद्धा महत्त्वाची आहे.