शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलवर कुठंही वाट्टेल ते मोठय़ानं बोलताय? - नीट पहा, लोक ऐकतात सगळं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 16:14 IST

गाडी चालवताना फोनवर बोलायला बंदी असली तरी प्रत्यक्षात आपण किती लाउड आवाजात फोनवर बोलतो, खासगी गोष्टी जगजाहीर सांगतो तपासून पहा.

ठळक मुद्दे90 टक्क्यांहून अधिक लोक मान्य करतात की, आपल्या अनेक खासगी गोष्टी आम्ही फोनवर बोलतो.

- निशांत सुर्वे

नव्या वाहतूक सुधारणा नियमांतर्गत मोबाइलवर बोलत गाडी चालवणार्‍यांचं लायसन्स तीन महिने रद्द करण्यात येणार असल्याची बातमी तर तुम्ही वाचलीच असेल. म्हणजे हा नियम लायसन्स नसणं, सिगAल तोडणं यांसारख्या अनेक गोष्टींना लागू आहे. मात्र मोबाइलवर बोलत गाडी चालवणार्‍या शूरवीरांना मात्र त्यातून वठणीवर आणता येईल, असं व्यवस्थेला वाटत असावं.वर वर अनेकांना हे नियम अन्यायकारकही वाटत असतील. हेल्मेट घाला, सिगAल पाळा, गाडी चालवताना फोनवर बोलू नका, ही काय सक्ती असंही वाटेल. मात्र रस्ते सुरक्षा आणि चालकासह अनेकांच्या जिवाला असलेला धोका पाहता हे नियम खरं तर राजीखुशीनं पाळायला हवेत.आता त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा गाडी चालवताना मोबाइलवर बोलण्याचा. असं काय काम अडीत असेल की मान वाकडी करकरून मोबाइलवर बोलावं लागत असेल? आणि अडीत असेलच तर गाडी बाजूला उभी करून मग ही बोलता येईल. मात्र काळ असा की, मोबाइल मॅनर्स या नव्या गोष्टीची जगभरातच एकूण भयंकर परिस्थिती आहे. आपल्याचकडे कशाला अमेरिकेत ऑसुरीऑन नावाच्या एका बडय़ा ग्लोबल लीडर टेक्नॉलॉजी सव्र्हिस लीडर असलेल्या कंपनीने अलीकडेच एक सव्र्हे केला. त्यात लोकांचे मोबाइल मॅनर्स तपासले गेले. त्यातले निष्कर्ष आपल्याकडे तंतोतंत लागू होतात. तपासून पहा, आपण सगळेच यापैकी कोणत्या ना कोणत्या कॅटेगरीत नक्की बसू.1. सव्र्हे केलेल्यांपैकी 45 टक्के लोक सांगतात की, आम्ही बाथरूम-टॉयलेटमध्ये; पण मोबाइल नेतो. सार्वजनिक ठिकाणीही नेतो. तिथून फोनवर बोलतो किंवा मेसेज करतो.2. 75 टक्के लोक म्हणतात की, आम्ही जेवण्याच्या टेबलवर फोन जवळच घेऊन बसतो. फोनवर बोलतो, मेसेज करतो. त्याचं बाकीच्यांनाही काही वाटत नाही.3. 85 टक्के लोक सांगतात की, आम्ही इतर लोकांचं सावर्जनिक ठिकाणी पर्सनल बोलणं मस्त ऐकत बसतो.4. मोबाइल ओव्हर शेअरिग्ां तर सगळेच करतात, इतकं शेअर करतो की काही गोष्टी फक्त शेअर करण्यासाठीच करतो.5. 90 टक्क्यांहून अधिक लोक मान्य करतात की, आपल्या अनेक खासगी गोष्टी आम्ही फोनवर बोलतो. कुठंही असलो तरी बोलतो. इतर लोक ते ऐकतात हेच विसरून जातो. सगळं खासगी जगणं फोनवर असतं, हेच आता विसरून गेलेलो आहोत.6. या 5 पैकी आपण किती कॅटेगरीत बसतो यावरून आपणच आपले मोबाइल मॅनर्स जोखलेले बरे.