शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

राइट टाइम, राइट प्लेस हे जमायला हवं!

By admin | Updated: January 22, 2016 08:40 IST

अभिनयाची आवड मला लहानपणापासूनच होती आणि घरून प्रोत्साहन मिळाल्याने मी शाळा-कॉलेजमध्ये असतानाच अनेक नाटकांत काम केलं.

- अभिजित खांडकेकर
 
अभिनयाची आवड मला लहानपणापासूनच होती आणि घरून प्रोत्साहन मिळाल्याने मी शाळा-कॉलेजमध्ये असतानाच अनेक नाटकांत काम केलं. काही प्रायोगिक नाटकंही केली, पण ते हौस म्हणून! त्यानंतर काही काळ मी रेडिओ जॉकी म्हणूूनही काम केलं, पण तेही प्रोफेशनली काम करण्याचा मी विचार केला नव्हता, कारण डोक्यावर गॉडफादरचा हात असल्याशिवाय इथे काम होतं नाही, असं मला वाटत होतं.
एक  वेळ अशी आली की अभिनय वगैरे सोडून द्यावं असाच विचार मी केला होता. पण सुदैवाने तेव्हाच माझ्यासमोर महाराष्ट्राचा सुपरस्टारच्या निमित्ताने मोठी संधी उभी राहिली आणि मी याच क्षेत्रात आलो.
खर सांगू तर स्ट्रगल हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा भाग असतो, तो कोणालाच चुकलेला नाही. नवीन आलेल्या प्रत्येकाला ओळख कमावण्यासाठी स्ट्रगल करावा लागतो.  मीही अशाच थोड्याफार परिस्थितीतून गेलो असलो तरी महाराष्ट्राचा सुपरस्टारसारख्या मोठय़ा टॅलण्ट हट शोमुळे माझा  स्ट्रगल थोडा कमी झाला. नवखे लोक जेव्हा ऑडिशन्स द्यायला जातात, तेव्हा त्यांना हे सिद्ध करावं लागतं की मी ही भूमिका यशस्वीरीत्या करू शकतो, तसेच ही मालिका माझ्या खांद्यावर सांभाळू शकतो. पण महाराष्ट्राचा सुपरस्टार करत असताना त्या काही महिन्यांत वाहिनीची माणसं आम्हाला निरखत होती, माणूस आणि अभिनेता म्हणून जोखत होती. त्यामुळे त्यांनी आम्हाला आधीच हेरून ठेवलं होतं, की ही मुलं डेली सोपवाली आहेत आणि आपण त्यांना कुठेतरी संधी देऊया. आणि त्यामुळे नंतरच्या ऑडिशन्समधून आम्ही चांगलं काम करून आमच्या भूमिका मिळवल्या. त्यामुळे इतरांच्या तुलनेत माझा प्रवास तसा सुकर होता असं मी म्हणेन.
अजून एक महत्त्वाची गोष्ट मी या प्रवासात शिकलो ती म्हणजे, "यू हॅव टू बी अॅट द राइट प्लेस, अॅट द राइट टाइम".  मी मुंबईत येऊन स्ट्रगल करतोय असं म्हणत नुसतं बसून राहिलं तर काहीच होत नाही. त्यामुळे तुम्हाला चार ठिकाणी फिरावं लागतं, ओळखी बनवाव्या लागतात, तरच मग ऑडिशन्स आणि त्यातून भूमिका असा मार्ग सुरू होतो. 
आणि तरीही हा प्रवास संपत नाही. शिकणं, स्वत:ला तपासणं आणि पुन्हा पुन्हा सिद्ध करणं हे सुरूच असतं!
 
मुलाखत व शब्दांकन : मीनाक्षी कुलकर्णी