शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
5
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
6
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
7
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
8
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
9
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
10
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
11
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
12
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
13
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
14
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
15
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
16
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
17
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
18
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
19
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
20
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
Daily Top 2Weekly Top 5

फोटोगिरी ते हॉबीगिरी...!

By admin | Updated: July 6, 2016 17:29 IST

माझा आवडता छंद’ या निबंधातून शाळकरी दिवसात प्रत्येकाच्या आयुष्यात छंद डोकावतो. तेव्हापासून तिकिट जमा करणं, फोटो काढणं याची सुरुवात होतेच.

- स्नेहा मोरे 
 ‘माझा आवडता छंद’ या निबंधातून शाळकरी दिवसात प्रत्येकाच्या आयुष्यात छंद डोकावतो. तेव्हापासून तिकिट जमा करणं, फोटो काढणं याची सुरुवात होतेच. पण मग सो कॉल्ड् ‘मोठे’ झालो की यापासून आपण काहीसे दुरावतो. फ्रेंड्स, कलिग्स आणि कॉर्पोरेट्सच्या जाळ्यात आपण स्वत:पासून दूर जातो. पण आता आपल्या आवडत्या छंदाशी कनेक्ट होणं सोप्प होणार आहे. 
आपल्या सारख्याच काही अवलियाने ‘हॉबीगिरी डॉट कॉम’ सुरु केले आहे. या ‘बिझी’ असणाऱ्या यंगस्टर्सना एनर्जी गेन करण्यासाठी आपल्या छंदाकडे परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. वसईच्या विनय निहलानी या तरुणाने ‘हॉबीगिरी’ सुरु केलीय. या वेबवर फोटोग्राफी, सायकलिंग , फुटबॉल, गिर्यारोहण ते अगदी गेमिंगपर्यंत अशा अनेक छंदांचा यात समावेश आहे. प्रत्येक हॉबीशी रिलेटेड अनेक गोष्टी या वेबवर अगदी सहज उपलब्ध होतात. बिझी शेड्यूल्डमुळे बऱ्याचदा एखाद्या वीकेंडला आपल्याला छंदाला वेळ द्यावासा वाटला, तरी पटकन त्याच्यासाठी वस्तूंची जुळवाजुळव करण्यातच वेळ निघून जातो. याच विचारातून ‘हॉबीगिरी’चा जन्म झाल्याचे विनयने सांगितले. 
हॉबीक्रेझी यंगस्टर्ससाठी हा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. क्रिकेट, क्विलिंग, डान्स,क्राफ्टींग, गार्डनिंग, स्पिरिच्युअ‍ॅलिटी ते अगदी डेटींगपर्यंतचे अनेक छंदांविषयीचे साहित्य या ठिकाणी सहज मिळेल. एकाच उत्पादनचे वेगवेगळे पयार्यही इथे आहेत. आपल्या बजेटचं गणित सांभाळून छंदाशी कनेक्ट राहता येईल याचीही काळजी घेतली आहे.
 
अशी झाली सुरुवात...
मॅनेजमेंटचा अभ्यास केल्यानंतर मार्केटींगमध्ये एमबीए केलं, त्यानंतर काही कंपन्यांमध्ये जॉब केला.  घरी काहीसे बिझनेसचेच वातावरण आहे. मला फोटोग्राफीचा छंद आहे, शाळेपासून फोटोस् काढतो. काहीशी फोटोग्राफी शिकलीसुद्धा आहे, पण या फिल्डमध्ये खूप हार्ड कॉम्पिटीशन आहे. मग फोटोग्राफी करता-करता त्याचे साहित्य विकण्याची कल्पना सुचली ती प्रत्यक्षातही आणली. काही दिवसांनी ‘फोटोग्राफी डॉट कॉम’ म्हणून वेब सुरु केलं. आणि बघता-बघता अवघ्या दिड महिन्यात खूप साहित्य विकलं गेलं. त्यामुळे मग इतर छंदांसाठीही असाच प्रयत्न करायचं मनातं आलं. त्यातूनच १० छंदांसाठी लागणाºया साहित्याने सुरुवात झाली, आता याच व्यासपीठावर ५०-६० छंदांचा समावेश असल्याचे विनयने सांगितले.