शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

लव्ह-लाइफच्या नावाखाली नुस्ता राडा झालाय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 07:20 IST

 ‘ऑक्सिजन’चा एक खास अंक-2020 ! विशीतल्या मुला-मुलींच्या आयुष्यातल्या स्वप्नांचा, ताण-तणावांचा, आनंद-दु:खाचा  आणि लव्ह-लाइफमधल्या गुंत्यांचा शोध

ठळक मुद्देका? कोण? काय? कधी? - लाइफच्या ‘ट्वेंटी ट्वेंटी’ची गोष्ट

-आशय निगडे 1. आत्ता माझ्या आयुष्यातली सर्वात भारी गोष्ट/घटना/व्यक्ती/विषय काय आहे? का?सध्या माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची आणि भारी गोष्ट विद्याथ्र्यामध्ये असलेली राजकीय जागृती आहे. ज्या प्रमाणात सोशल मीडियावर, कट्टय़ा-कट्टय़ावर, चहाच्या टपरीवर किंवा अगदी हॉटेलमध्ये विद्यार्थी, नुकतेच डिग्री घेतलेले ज्या हिरिरीने राजकारणाबद्दल बोलत आहेत ती गोष्ट मला खूप आनंद देते. मग त्यांचे दृष्टिकोन कोणतेही असोत. 

2. आत्ता माझ्या आयुष्यात मला सगळ्यात जास्त स्ट्रेस कशाचा आहे? का?

मला सगळ्यात जास्त स्ट्रेस सध्या माझ्या जानेवारीत असलेल्या परीक्षेचा आहे.

3. खूप मित्र-मैत्रिणींच्या दोस्तीमुळे मी मजेत, आनंदी आहे? की खूप मित्र-मैत्रिणी असूनही मी मनातून एकटा/एकटी आहे?

हे वेळोवेळी बदलत राहातं. मी या गोष्टीत खूश आहे की जर मला स्पेस हवी असेल तर माझी मित्रमंडळी ते समजून घेतात आणि एका कॉलवर धावूनही येतात.

4. कोणाची जनरेशन जास्त गंडलेली आहे? माझी की माझ्या आई-वडिलांची? 

 आमच्या आईबाबांची पिढी ही गंडलेली जनरेशन आहे आणि त्यांना त्यांच्या मुलांशी कनेक्टच करता येत नाही.

5. आमच्या जनरेशनचं ‘लव्ह-लाइफ’ हा आमच्या आयुष्यातला ‘दिलासा’ आहे की कॉम्प्लिकेटेड वैताग देणारा स्ट्रेस? 

 लव्ह-लाइफच्या नावाखाली माझ्या जनरेशनने सगळाच नुस्ता राडा घालून ठेवलाय, कारण नसताना!

6. पुढच्या आयुष्यात काय करायचं हे माझं नक्की ठरलंय का? काय ठरलंय? पुढे काय करायचं हे काही प्रमाणात ठरलं आहे. सर्वशक्तीसह एकतर राजकारणात उतरायचं किंवा स्वतर्‍ची वकिली सुरू करायची आहे. हे दोन्ही एकमेकांना पूरक असू शकतं, त्यामुळे मला त्याचा स्ट्रेस नाहीये फार.

7. संधी मिळाली तर भारत सोडून परदेशात जाईन/संधी मिळाली तर परदेशात शिकायला-नोकरी करायला जाईन; पण भारतात परत येईन ! - यातला कुठला ऑप्शन मी घेईन? का?

संधी मिळाली तर मला परदेशात शिकायला नक्की आवडेल, आता मला त्याचा काहीच अनुभव नसल्याने तिथेच राहीन की नाही हे सांगता येत नाही; पण मला भारताच्या भविष्यावर विश्वास आहे, त्यामुळे 99 %  परतच येईन.

8. भारताविषयी मला अत्यंत अभिमान वाटतो अशी गोष्ट कोणती? अत्यंत लाज वाटते, संताप येतो अशी गोष्ट कोणती?

मला अभिमान या गोष्टीचा वाटतो की बर्‍याच कमी वेळात आपण खूप प्रगती केली, विविध क्षेत्रात. संताप याचा वाटतो की 21 व्या शतकातही मला धर्माधपणा, जातीवाद, अंधश्रद्धा या गोष्टी दिसतात.