शहरं
Join us  
Trending Stories
1
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
2
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
5
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
6
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
7
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
8
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
9
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
10
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
11
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
12
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
13
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
14
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
15
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
16
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
19
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

नथीचा नखरा करून पाहा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 03:00 IST

नथ नाकातच घालतात; पण आता नथीचे कानातले, गळ्यातलेही मिळू लागलेत. एक नवीन फॅशन म्हणून.

- सारिका पूरकर - गुजराथी

सा-या सख्या-सजणींचा लाडका हसरा-नाचरा र्शावण आलाय. उत्साहाचं उधाणच. सणवार, व्रत-वैकल्यांच्या या महिन्यात नटण्या -मुरडण्याची एकही संधी सोडावीशी वाटत नाही. 

श्रावणातील या नटण्याला थोडी लेटेस्टची जोड दिली तर चारचौघीत तुम्ही नुसत्याच उठून दिसणार नाहीत तर तुम्हाला स्वत:लाही काही तरी पारंपरिकच पण तरीही वेगळं, छान घातल्याचा फील येत राहील. त्यासाठी फार काही करायचं नाहीये, खिशाला चाटही द्यायची नाहीये.  छोट्या-छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्यात तर यंदाच्या श्रावणात तुमचा तोरा काही औरच असेल बरं का ! तर या श्रावणासाठीचा लेटेस्ट फंडा आहे   नथ मंगळसूत्र..  

एरवी नाकात घालायची नथ आता मंगळसूत्रात घातली जातेय.  होय, काळ्या मण्यांच्या दाट सरी व मध्यभागी नथीच्या आकारातील नव्हे तर थेट मोत्याची नथ हीच पेंडंट म्हणून घातलेले हे मंगळसूत्र  सध्याचा इन ट्रेण्ड आहे. मराठी वाहिनीवरील मालिकेतल्या एका नायिकेने हा फंडा लोकप्रिय केलाय.  ठसठशीत तसेच पारंपरिक लूकबरोबरच हटके लूकही या मंगळसूत्रामुळे येतो, हे मंगळसूत्र लांबीला जास्त नसते. ठुशीच्या लांबीपेक्षा थोडे जास्त लांबीचे असते. तुम्ही याला गळ्याभोवतीदेखील घालू शकता (स्पृहा जोशीने नव्हते का घातले पाणी फाउण्डेशनच्या कार्यक्रमात.)   त्यामुळेही ते खुलून दिसते.  काठपदराची, प्युअर सिल्कच्या साडीवर हे मंगळसूत्र घातलं की तुमचा नूर खुललाच म्हणून समजा! 

नथीच्या मंगळसूत्राबरोबर लिंबोटी माळ, पोहेहार, चपलाहार,  एकदाणी यापैकी काहीही घालून तुम्ही श्रावणसाज पूर्ण करू शकता. काळ्या मण्यांच्या दाट सरी नको असतील तर नाजूक काळे मणी व जाणव्यांचे एकेरी मंगळसूत्रही नथ घालून छान दिसते. यामध्ये मात्र नथीचे पेंडंट अगदी नाजूक असते.  हे मंगळसूत्र तुम्ही कुर्ती, पंजाबी ड्रेसवर सहज कॅरी करू शकता. 

हे झालं लग्न झालेल्यांचं; पण ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांच्यासाठीही बाजारात कलरफुल दो-यात नथ पेंडण्ट  मिळतं.

नथीचे कानातलेही आता खूप लोकप्रिय होत आहेत. 

अर्थात फार पूर्वीही आली होती ही नथीच्या कानातल्याची फॅशन.  स्मिता तळवळकर यांची निर्मिती असलेल्या सवत माझी लाडकी या मराठी चित्रपटात त्यांनी नथीचे कानातले घातले होते ! 

एकूण काय फॅशनचं चक्र गोल गोल फिरतं, आता त्या चक्रात नथ नव्यानं आली आहे, इतकंच!