शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

अनाहूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2018 16:06 IST

लैंगिक शिक्षणाची गरज काय हे सांगणारा एक अस्वस्थ अनुभव

- माधुरी पेठकर उमेश बगाडे. त्याला लहानपणापासून गोष्टी सांगायला आवडतात. त्याच्या हातात आता शॉर्ट फिल्मसारखं प्रभावी माध्यम आहे. आता तो नुसती गोष्ट सांगत नाही तर त्यातून काहीतरी महत्त्वाचं मांडण्याचाही प्रयत्न करतो. त्याच प्रयत्नात त्यानं दोन शॉर्ट फिल्म केल्या. पहिली चौकट आणि दुसरी अनाहूत. उमेशच्या या अनाहूत शॉर्ट फिल्मला नुकताच फिल्मफेअर (पॉप्युलर अवॉर्ड फॉर नॉन फिक्शन कॅटिगिरी) पुरस्कार मिळाला आहे.२० मिटिांची फिल्म. अनाहूत. मधू नावाच्या किशोरवयीन मुलीची ही गोष्ट. लैंगिक शिक्षणाची गरज काय? याविषयी बोलते. मधूच्या शाळेत लैंगिक शिक्षण विषयावर बोलायला सामाजिक संस्थेतल्या डॉ. मैत्री येतात. मुख्याध्यापिका आणि शिक्षकांना त्या हे सांगतात की विद्यार्थ्यांना लैंगिक शिक्षण देणं किती महत्त्वाचं आहे, पण काही शिक्षकांना वाटतं की या वयात मुलांना असल्या शिक्षणाची गरज नाही. अडनिड्या वयातल्या त्यांच्या समस्यांचं निरसन करण्यास शाळा समर्थच आहे. डॉ. मैत्रींनी काही सांगण्याची गरज नाही. शेवटी डॉ. मैत्री आणि त्यांच्या सहकाºयांना केवळ विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीची परवानगी दिली जाते.आरोग्य तपासणी करताना डॉ. मैत्रींना आठवीत शिकणारी मधू भेटते. पोट दुखत असल्यानं शाळेतून घरी जाण्याची परवानगी मिळालेली मधू भावाची वाट पाहात असते. मधूच्या चेहºयावरचे भाव ओळखून डॉ. मैत्री तिच्याशी बोलतात. बोलता बोलता डॉ. मैत्रींच्या लक्षात येतं की मधूवर घरातच लैंगिक अत्याचार होतोय. शंकेपोटी त्या मधूची तपासणी करतात त्यात आठवीतली मधू गर्भवती असल्याचं आढळतं.लैंगिक शिक्षणाची गरजच नाकारणाºया मुख्याध्यापक आणि शिक्षकांना मधूच्या आयुष्यातल्या या अनाहूत अपघातानं हादरा बसतो. त्यांना बसतो तोच धक्का फिल्म पाहताना आपल्यालाही बसतो.उमेश सांगतो, ‘मित्रानं शाळेतल्या एका हेल्थ चेकअपदरम्यानचा प्रसंग सांगितला. तो ऐकून मी हादरलो. मग अनेक शाळांमध्ये गेलो. तिथल्या शिक्षकांशी, शाळेतल्या मुला-मुलींशी, त्यांच्या पालकांशी बोललो. डॉक्टरांना, समुपदेशकांनाही भेटलो. लैंगिक शिक्षणाची आजची स्थिती आणि त्याची गरज यावर भाष्य करणारी फिल्म बनवण्याचं मग मी ठरवलं.आपल्या फिल्ममधून समाजासमोर काही एक महत्त्वाचा विचार ठेवण्याचा प्रयत्नही तो करतो. तोच विचार त्यानं त्याच्या पहिल्या ‘चौकट’ या फिल्ममधूनही मांडला आहे.चौकट ही फक्त घरा दारालाच नसते. आपल्या मनालाही असते. रूढी-परंपरांच्या, धारणांच्या, पूर्वग्रहांच्या अनेक चौकटी असतात. या चौकटीत राहून वागणारी माणसं साचेबद्ध, कट्टर किंवा अगदी खलनायकही वाटू शकतात; पण खरंच ती तशी असतात की निव्वळ चौकट त्यांना तसं वागायला भाग पाडते. ती चौकट मोडता येते का आणि मोडलीच तर जगाकडं छान, प्रसन्न नजरेनं पाहता येतं का, हेच तो या फिल्ममधून मांडतो आहे.चौकट हीच या शॉर्ट फिल्मची हिरो आहे आणि व्हिलनही. ही चौकट घरातून अंगण आणि अंगणातून घर दाखवते. घरात बघितलं तर दिसतं की घरातली एक बाई देवाच्या नैवेद्यासाठी पुरण करतेय. अंगणात एक वृद्ध याचक चतकोर भाकरीसाठी ताटकळलेला आहे. चौकटीच्या आतली बाई त्याला सांगते, ‘देवपूजेआधी काहीही मिळणार नाही’. चौकटीबाहेरचा याचक देवपूजा आटोपणाच्या प्रतीक्षेत बाहेर बसून राहतो. ते पाहून घरातील बाई त्याच्या हातात शिळ्या भाकरी ठेवते. पुन्हा पूजेच्या आणि नैवेद्याच्या कामात गढून जाते. यथासांग पूजा आणि नैवेद्य होतो. सहज म्हणून ती बाहेर डोकावते तर तिनं दिलेली शिळी भाकरी खाऊन तृप्त झालेल्या त्या म्हाताºयानं भाकरीचं ॠण फेडायचं म्हणून अख्खं अंगण झाडून ठेवलेलं असतं. तो जात असतो.हे बघून चौकटीआतली स्त्री अस्वस्थ होते. रितीरिवाजांच्या चौकटीत अडकून दारात आलेल्या याचकावर अन्याय केल्याची भावना तिला छळायला लागते. एका क्षणी तर देवासमोरचं नैवेद्याचं ताट घेऊन धावते. पण दाराची चौकट पुन्हा तिला अडवते. ते दारंही ती जोरजारात धक्के देऊन उघडते...फिल्मच्या सुरुवातीला काहीतरी अडवून धरणारी चौकट शेवटच्या दृश्यात मोकळी होऊन प्रसन्न हसताना दिसते. १२ मिनिटांचा हा लघुपट. यात मोजून ७ संवाद. केवळ दृश्यांच्या माध्यमातून हा लघुपट संवाद साधतो. एक अनुभव देतो.. वेगळाच!

उमेश बगाडेची ‘अनाहूत’ ही २० मिनिटांची शॉर्ट फिल्म पाहण्यासाठी ही लिंक https://www.filmfare.com/awards/short-films-2018/finalists/anahut-uncalled/2389   ही फिल्म पाहण्यासाठीची लिंक https://youtu.be/AKjsT8-8GYMmadhuripethkar29@gmail.com