शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

मिडल पार्टिशन-अनुष्का-दीपीकाची ही कुठली नवीन हेअर स्टाईल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 13:58 IST

मधला भांग, तेल लावूच चापूनचोपून अंबाडा किंवा वेणी हे स्टायलिश आहे? - कोण म्हणतं, नाही?

ठळक मुद्देओल्ड इज बॅक या कॅटेगरीतीलच स्टाइल आहे. 

सारिका पूरकर-गुजराथी

दीपिका पादुकोण, अनुष्का शर्मा यांचे शाही विवाह सोहळे, वेडिंग लोकेशन, वेडिंग कार्ड, लेहंगे हे सारं बरंच चर्चेत होतं, गाजलंही.  ट्रेण्डसेटर ठरलं. तसंही या दोघीही जे काही परिधान करतात, जे दागिने वापरतात, तो आता ट्रेण्ड बनतोच. मात्न या दोघींच्या वेडिंग लेहंग्याप्रमाणेच आणखी एक गोष्ट चर्चेत राहिली, ती म्हणजे वेडिंग रिसेप्शनसाठी त्यांनी केलेली हेअर स्टाइल.  दोघींनीही रिसेप्शनसाठी केसांचा मध्यभागी भांग पाडून अगदी चप्पट स्टाइल करून केसांचा अंबाडा घातला होता.  त्यावर भरपूर गजरे माळले होते.   भांगात लालचुटूक सिंदूर भरला होता.  गजबच दिसत होत्या. त्यांनी रिसेप्शनसाठी नेसलेल्या साडीवर ही स्टाइल भारी शोभून दिसली. एरवी केसांचा मध्यभागी भांग, अगदी तेल चोपडून केल्यासारखी वाटणारी ही स्टाइल म्हणजे आजीबाई स्टाइल म्हणूनच माहीत आहे. पूर्वी केसं गळून स्वयंपाकघरात पडू नयेत म्हणून बायका भरपूर तेल लावून, मधोमध भांग पाडून पाठीमागे घट्ट अंबाडा घालत असत. एकदा घातलेला अंबाडा दुसर्‍याच दिवशी सोडला जायचा. गळ्यात केस घेऊन फिरलं तर केवढा त्रागा केला जायचा घरोघर. पण मग ती काकूबाई स्टाइल मागे पडली. तेल लावणंच कालबाह्य झालं. आता मात्र या दोघींमुळे ही स्टाइल पुन्हा हिट झाली. मिडल पार्टिशन या नावाने ती ओळखली जाऊ लागली. केवळ अनुष्का, दीपिकाच नाही तर सोनम कपूर, अदिती राव हैदरी, आलिया भट, सोनाक्षी सिन्हा, करिना कपूर, ऐश्वर्या राय-बच्चन, प्रियंका चोप्रा, श्रद्धा कपूर यांनीही गेल्या काही दिवसांत ही स्टाइल फॉलो केलेली दिसते. फारसे श्रम न घेता, कमी वेळात ही स्टाइल लांब, मध्यम लांब केसांसाठी करता येऊ शकते. शिवाय ट्रॅडिशनल लूकही सहज मिळतो. केवळ साडी, लेहंगा, घागरा, अनारकली, सलवार-कमीज, पलाझो या पारंपरिक कपडय़ांवरच नाही तर कॉर्पोरेट  ब्लेझर्स, जीन्स-टय़ुनिक, वनपीस, शॉर्ट वन पीस, ट्राउझर्स, पॅन्टसुट्स, जम्पसुट्स या वेस्टर्न आउटफिट्सवरही मिडल पार्टिशन करून केसं मोकळे सोडले तर सुंदर दिसतात.  मिडल पार्टीशन करून  केसांची छान पोनीटेलही तुम्ही घालू शकता.  साडीसाठी ही स्टाइल करणार असाल तर मिडल पार्टिशनबरोबरच दोन्ही बाजूने छोटय़ा बटवेण्याही छान दिसतात.  हीदेखील ओल्ड इज बॅक या कॅटेगरीतीलच स्टाइल आहे. मिडल पार्टिशनमुळे म्हटलं तर तुम्हाला खूप मॅच्युअर्ड लूक मिळतो, म्हटलं तर ट्रॅडिशनल आणि कधी कॅज्युअल आणि फंकी लूकदेखील. असं काही सोप्प केलंत ना तरी स्टायलिश दिसू शकतं. ट्राय इट.