शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

तुफान बार्गेन करा

By admin | Updated: October 9, 2014 18:16 IST

सहलीला गेलात की, बिंधास्त रहा, नाहीतर नव्या गावात निभाव लागणं अवघड !

आता ऑक्टोबर सुरु झाला. अनेकजण ट्रीप्सचं बुकिंग करू लागतील. काहीजण तर बॅगपॅकची तयारी करतील.
सहलीला जातील. कॅम्प फायर सजू लागतील. आणि आता तर प्रवासातही स्टायलिशच रहायचं हा एक मोठा ट्रेण्ड आहे.
पण त्यापलीकडे जाऊन खरा प्रॉब्लम होतो तो वेगळाच. अनेकजण आपल्या सहलीचा शेवटचा दिवस शॉपिंगसाठी राखून ठेवतात. त्यादिवशी दम लागेपर्यंत शॉपिंग करतात.
आणि मग काही चुका हमखास होतात, अशा गोष्टी घरी येतात ज्या आपण कधीच वापरत नाहीत.
सो, यावेळी ट्रीप प्लॅन कराल, नव्या जागी शॉपिंगला जाल तेव्हा काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
शॉपिंग पैसावसूल झालीच समजा.
तिथलं ‘खास’ तेच घ्या.
हल्ली सगळं सगळीकडे मिळते. त्यामुळे त्या जागेची खासियत काय, असं काय आहे जे फक्त तिथंच मिळतं तेच घ्या. बाकीचं कशाला घ्यायचं? त्यासाठी जिथं जाल त्या जागेविषयी आधीच जरा होमवर्क करा. काहीनाही तर तुम्ही जिथं उतराल तिथल्या लोकांना, रिक्षावाल्यांना विचारा इथं खास काय मिळतं. आनॅलाइन माहिती तर सगळीकडे मिळते. बोगस वस्तूंची खरेदी अनेकजण करतात आणि मग पस्तावतात.
बिंधास्त करा बार्गेनिंग
घासाघीस करून खरेदी जगभर होते. त्यामुळे बार्गेनिंग करणं म्हणजे भलतंच चीप असलं काहीतरी डोक्यातून काढून टाका. घासाघीस करण्यात अजिबात लाजू नका. बाजारात जाण्यापूर्वी जरा भावांची एकंदर चाचपणी करा. मनात दोन आकडे धरा. एक म्हणजे तुम्ही कमीत कमी किती द्याल तो आकडा, कुठे तोलमोल तोडाल, तो आकडा. मात्र बार्गेनिंग मात्र कराच. 
पाकीट जरा रिकामंच ठेवा.
रोख रक्कम देऊन खरेदी करायला जाणार असाल तर खर्चायचे पैसे फक्त वॉलेटमध्ये ठेवा. बाकी बिल्स वगैरे अन्यत्न ठेवा. यामुळे दोन हेतू साध्य होतील. एकतर विकणार्‍याला कळेल की, याच्या पाकिटात फार काही पैसे नाही, गिर्‍हाईक जेमतेम आहे. बरोबर बार्गेन करतंय  आणि दुसरं म्हणजे स्वत: ठरवलेल्या बजेटच्या बाहेर तुम्ही खर्च करणार नाही आणि पाकीट कापलं गेलंच तर निदान घरी जाण्यापुरते पैसे राहतील कुठंतरी हाताशी जपून ठेवलेले. शक्य असल्यास क्रे डीट कार्डद्वारे खरेदी करा.
भेट द्यायला काय आणाल? 
गावाला गेलं की नातेवाईक मित्रमैत्रिणींसाठी काहीतरी आठवण म्हणून सगळेच आणतात. पण आणणार काय असं यादगार? तर असं काहीतरी आणि जे त्या जागेची ओळख असेल. कीचेन्स, मग्स, टीशर्ट असं काहीतरी आणा, त्या गावाची स्पेशालिटी सांगणारं ! 
- प्राची खाडे 
स्टायलिस्ट आणि पर्सनल शॉपर