शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
6
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
7
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
8
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
9
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
10
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
11
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
12
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
13
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
14
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
15
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
16
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
17
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
18
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
19
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
20
२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं
Daily Top 2Weekly Top 5

भरभरून जगायचं, तर करायच्या १0 गोष्टी

By admin | Updated: February 19, 2015 20:45 IST

चांगली पुस्तकंही वाचत नसाल, बरी माणसंही अवती-भोवती नसतील, तर तुमचं भविष्य दुसर्‍या कुणी कशाला सांगायला हवं?

शिव खेरा ,(‘सेल्फ हेल्प’ पुस्तकांचे लोकप्रिय लेखक. भारतीय तरुण मुलांनी काही गोष्टी आवर्जून केल्या पाहिजेत, असं सांगणार्‍या त्यांच्या एका वेबसाइटवरील लेखाचा संपादित आणि मुक्त अनुवाद) - 

 
 
आजपासून पाच वर्षांनी तुम्ही कुठं असाल? या प्रश्नाचं उत्तर फक्त दोनच गोष्टी देऊ शकतात.
१) आज तुम्ही नेमकी कुठली पुस्तकं वाचताय?
२) आणि सध्या तुम्हाला संगत कुणाची आहे?
चांगली पुस्तकंही वाचत नसाल, बरी माणसंही अवती-भोवती नसतील, तर तुमचं भविष्य दुसर्‍या कुणी कशाला सांगायला हवं?
- मला वाटतं तरुण मुलांनी फक्त काही मोजक्या गोष्टी लक्षात ठेवल्या आणि तेवढय़ा मनापासून केल्या तरी ते त्यांचं जगणं एका खास उंचीवर नेऊ शकतात.
 
१)जे कराल, ते उत्तम करा!
विसरून जा की, तुमची स्पर्धा दुसर्‍या कुणाशी आहे! जे कराल ते उत्तम करा, पहिल्याच फटक्यात  असं खास काहीतरी करा की, ते उत्तमच असलं पाहिजे! आणि मुख्य म्हणजे जे केलं ते केलं, त्याहून काहीतरी खास करण्याची तयारी करा!
 
२) इन्व्हॉल्व व्हा
आपण जर प्रश्न सोडवायला राजी नसू तर आपणही त्या प्रश्नाचाच एक भाग बनतो, स्वत:च प्रॉब्लेम होऊन बसतो. त्यामुळे सतत तक्रार करणं सोडा, जे समोर येईल त्याला भीडा. त्यामुळे एकतर झोकून देऊन काम करा, नाहीतर निदान तोंड तरी बंद करा.
 
३)थोडंसं एक्स्ट्रा
लोकांच्या अपेक्षांपेक्षा जास्त काहीतरी करण्याची, जास्त प्रयत्न करून थोडं जास्त काम करण्याची तयारी ठेवा! जेमतेम आणि नेमून दिलेलं काम तर सगळंच करतात, तुम्ही काहीतरी एक्सट्रा करणार की नाही हे ठरवा!
 
४) भूमिका घ्या
 सगळंच गोलमोल, वारा आला तशी फिरवली पाठ. तर तुम्ही लाटेबरोबर वाहून जाल. त्यापेक्षा निष्ठा ठेवा, भूमिका घ्या आणि त्यावर ठाम रहा.
५) फोकस
 तुमचं लक्ष्य काय, तुम्हाला नक्की काय हवंय, हे विसरू नका. काहीही झालं तरी, तुमचा फोकस हलता कामा नये.
६) मित्र जरा जपून निवडा.
 नेता  चांगला असतो, पण त्याचे सल्लागार वाईट असतात, हे वाक्य आपण सतत ऐकतो. तसं आपलं होऊ नये, म्हणून जरा मित्र चांगले आणि जपून निवडा. चांगली यशस्वी माणसं पहा आणि त्यांचे मित्र पहा, संगतीचा असर होतोच.
 
७)  स्वत:वर भरवसा ठेवा
अनेकदा इथंच गाडं घसरतं. असतं सगळं पण आपला स्वत:वर भरवसा नसतो. आपल्याला स्वत:विषयी चांगलं वाटलं तर जग चांगलं दिसतं. नात्यागोत्याची माणसं चांगली वागतात. त्यामुळे जरा स्वत:वर भरवसा ठेवून, स्वत:वरही प्रेम करा. 
 
८) कॅरॅक्टर जपा.
एका रात्रीत काही कुणाचं कॅरॅक्टर तयार होत नाही. अनेकदा काही माणसांविषयी आपल्याला वाटतं भलतंच, पण ती असतात वेगळीच.  त्यामुळे आपली रेप्युटेशन काय तयार होतेय याकडे जरा लक्ष द्या. एकदा प्रतिमा डागाळली तर ती सुधारायला प्रचंड कष्ट पडतात.
 
९) जगायचं कशासाठी?
विचारा स्वत:ला! आपण कशासाठी जगतोय. आपलं ध्येय काय? जगणं खूप सुंदर आहे, ते नाकारू नका. असं म्हणतात ना की, काहीतरी करून अपयश मिळणं हे काहीच न करण्यापेक्षा केव्हाही चांगलंच! त्यामुळे आपल्या जगण्याची दिशा शोधा.
 
१0) दिवसाची सुरुवात आनंदी
उठलं की फोन असं होतं का तुमचं? त्यापेक्षा दिवसाची सुरुवात आनंदी होईल, असा प्रयत्न करा. अनेकदा छोट्या गोष्टीनं मूड जातो आणि आपण काहीच करत नाही. फक्त चिडचिड. असं होऊ नये. त्यामुळे उठल्या क्षणापासून स्वत:ला पॉझिटिव्ह एनर्जीचा एक डोस द्या.