शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची मोठी घोषणा! इराणविरोधातले ऑपरेशन 'एपिक फ्यूरी' संपले; युद्धातून सपशेल माघार घेतली की? 
2
Top Marathi News Live: निकालानंतर तामिळनाडूत राजकीय भूकंप, AIDMK पक्षात मोठी फूट पडणार?
3
'आम्ही तुमचं कर्ज माफ करू..' तुम्हालाही असा फोन आलाय? तर व्हा सावध! RBI नं दिली मोठी अपडेट
4
NDA मध्ये शिक्षक असल्याचा केला होता दावा; डॉ. संतोष गोयल यांना लष्कराचे जवान घेऊन गेले, मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
5
शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्र अन् मनसेनं केला विरोध
6
Rohit Pawar : "राज्यातल्या लेकीबाळी सुरक्षित नाहीत, सरकार निवडणूक आणि जल्लोषात मग्न"; रोहित पवार संतापले
7
संजू सॅमसनची फलंदाजी 'सुपरहिट'; पण शरीराचा आकार पाहून दिग्गज म्हणाला- ही तर चिंतेची बाब!
8
Astro Tips: शनिदेवाची कृपादृष्टी आपल्यावर होते तेव्हा मिळतात 'हे' संकेत; तुम्ही अनुभवलेत का?
9
‘एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा  
10
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
11
'जमील जमाली'चा नोरा फतेहीसोबत डान्स, राकेश बेदींनी शेअर केला बीटीएस व्हिडीओ
12
‘या‘ निकषांमध्ये फिट बसणार, त्यालाच बंगालचा मुख्यमंत्री बनवणार, अमित शाहांनी आधीच दिले होते संकेत 
13
Vi Share Price Today: व्होडाफोन आयडियाच्या टॉप मॅनेजमेंटमध्ये मोठे बदल; कुमार मंगलम बिर्लांकडे आता 'ही' जबाबदारी, शेअर सुस्साट
14
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
15
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
16
"...तर भाजपाला आज लोकसभेच्या १४० जागाही जिंकता येणार नाही", राहुल गांधी केंद्र सरकारवर संतापले
17
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
18
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
19
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
20
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
Daily Top 2Weekly Top 5

फक्त ‘टच’मधे राहण्याचा अतिरेक, अर्थहीन होत जाणार्‍या संवादाची एक पायरी

By admin | Updated: December 5, 2014 11:56 IST

एखादी व्यक्ती, तिचं म्हणणं, वागणं किती गांभीर्यानं घ्यायचं याचा विचार आपण आपल्या अनुभवातून, समजेनुसार करतो. तसंच त्या व्यक्तीशी वागतो. माध्यमांचंही असंच होतं.

 
एखादी व्यक्ती, तिचं म्हणणं, वागणं किती गांभीर्यानं घ्यायचं याचा विचार आपण आपल्या अनुभवातून, समजेनुसार करतो. तसंच त्या व्यक्तीशी वागतो. माध्यमांचंही असंच होतं. वर्तमानपत्रं सुरु झाली त्या काळात वर्तमानपत्रातला प्रत्येक शब्द माणसं गांभीर्यानं घ्यायची, आदरानं वाचायची. मग टीव्ही आला. टीव्ही हे एक माहितीचे आणि मनोरंजनाचे साधन म्हणूनच लोकांनी त्याकडे पाहिले. सिनेमा म्हणजे वेळ घालवण्याचं, वैयक्तिक आनंद मिळवण्याचं माध्यम. आणि त्यानंतर इंटरनेट आणि आता मोबाइलवर इंटरनेट आले. फेसबुक-व्हॉट्स अँप, त्यांच्यावरचा संवाद ही फार कमी गांभीर्यानं घेण्याची गोष्ट आहे, अशी एक भावनाच लोकांमधे तयार होते आहे. त्यावर जे बोलणं होतं, जे शेअर होतं, पुढे पाठवलं जातं ते सगळं तात्पुरतं, लाईटली घ्यायचं असतं असाच एकूण त्या माध्यमांकडे पाहण्याचा दृष्टिकोन. कारण त्यांचा हेतूच मुळात ‘संपर्कात’ राहणं एवढाच आहे. तत्काल प्रतिक्रिया, तात्पुरता संबंध यापलीकडे तिथल्या संवादाला फार अर्थ नाही, असंच ती माध्यमं वापरणार्‍यांना नकळत वाटू लागतं. त्या माध्यमाचा लोक गंमत म्हणून वापर करतात. केवळ आपण ‘टच’मधे आहोत, एवढीच भावना ते माध्यम 
देतं ! आणि त्यातून सुरू होतं एक ‘अनइन्व्हॉल्व्ड’ कम्युनिकेशन. म्हणजेच कुठल्याही भावनिक गुंतवणुकीशिवाय असलेला संवाद. आपण प्रत्यक्षात माणसांशी जेव्हा बोलतो त्यात काहीतरी भावनिक गुंतवणूक असते. प्रेम, राग, लोभ, काहीतरी असतं. या माध्यमांच्या अतिरेकी वापरामुळे कुठल्याच संवादात अशी काही ‘इन्व्हॉल्वमेण्ट’ वाटत नाही अशी भीती आहे. त्यात वाईट म्हणजे अनेक तरुणांच्या आयुष्यात प्रत्यक्ष संवादापेक्षा आभासी जगातला असा गुंतवणूक नसलेला संवाद वाढला आहे. आणि त्यातून मग संवादात पण भुसभुशीतपणा येण्याची शक्यता असते. आणि गंमत म्हणून, तिथं जे बोललं जातं, ते गांभीर्यानं न घेण्याची एक सवयच लागते.
माध्यमांच्या अतिरेकी सुलभ वापरातून हे पोकळपणाचे धोके आता दिसू लागले आहेत.
- विश्राम ढोले
संस्कृती आणि माहिती-संज्ञापनाचे अभ्यासक